Thursday, May 28, 2026
Latest:
ताज्या घडामोडी

मुलाच्या मृत्यूनंतर आईची गळफास घेऊन आत्महत्या, दोघांच्याही आत्महत्या मागील गूढ लवकरच समोर येणार

मुलाच्या मृत्यूनंतर आईची गळफास घेऊन आत्महत्या, दोघांच्याही आत्महत्या मागील गूढ लवकरच समोर येणार

अंबाजोगाई (प्रतिनिधी)

      विषारी औषध प्राशन केल्या मुळे स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मुलाचा मृत्यू झाल्या नंतर त्याची सावत्र आईने रुग्णालय परिसरात असलेल्या सांस्कृतिक सभागृहाच्या मागील बाजूस एका झाडास गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवण्याची घटना आज मध्यरात्री घडली.

   याविषयी प्राप्त माहिती अशी की केस तालुक्यातील सोनी जवळा येथील रहिवासी असलेल्या अनिल साहेबराव पवार या युवकाने चार पाच दिवसापूर्वी विषारी औषध प्राशन केल्यामुळे त्याला त्या दिवसा पासून अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. काल सायंकाळी अनिलची प्राणज्योत मावळल्यामुळे आणि त्याचे शवविच्छेदन आज करण्यात येणार असल्याने त्याचे शव शवा गृहात  ठेवण्यात आले होते व सर्व नातेवाईक रुग्णालय परिसरात तळ ठोकून होते. 

    यावेळी अनिलची सावत्र आई सविता (काल्पनिक नांव )वय 40 वर्ष ही पण या परिसरात उपस्थित होती. आपल्या मुलाच्या मृत्यूची खबर लागल्यामुळे सविता हिने आज मध्यरात्री स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय परिसरात असलेल्या सांस्कृतिक सभागृहाच्या मागील बाजूस असलेल्या एका झाडास गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली. 

    कुटुंबातील अन्य सदस्यांनी रात्रीतून गायब झालेल्या सविताचा शोध घेतला असता त्यांना सविता ने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. 

      चार-पाच दिवसांपूर्वी सावत्र मुलगा विष प्राशन करतो काय त्याचा उपचारादरम्यान मृत्यू होतो काय आणि या मृत्यूनंतर लागलीच रातोरात सावत्र आई गळफास घेऊन आत्महत्या करते काय? यामागे निश्चितच त्यांच्या या नात्याला एक वेगळीच पार्श्वभूमी आणि त्या दोघांच्याही आत्महत्येचे गुड रहस्य असण्याची शक्यता असून याचा शोध आता पोलिसांना नाही घ्यावा लागणार आहे  

      दरम्यान आता दोघाही माय लेकराचे शव विच्छेदन होणार असून पोलिसात दाखल होणाऱ्या गुन्ह्या नंतर सर्व काही घटना दृष्टीपथात येणार आहे.

    

पोलिसांनी केला घटना स्थळाचा पंचनामा

पोलीस नितीक्षक शरद जोगदंड यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस उपनिरीक्षक कांदे व पो हे को भोले यांनी घटना स्थळी धाव घेऊन पंचनामा केला आसुन तपासात कांय निष्पन्न होणार हे येणार काळ ठरवणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!