ताज्या घडामोडी

उन्हाळी सुट्ट्या व त्यामुळे नागरिकांचे प्रवास पाहता अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनच्या वतीने नागरीकांना जाहीर आवाहन

उन्हाळी सुट्ट्या व त्यामुळे नागरिकांचे प्रवास पाहता अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनच्या वतीने नागरीकांना जाहीर आवाहन

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
   उन्हाळी सु‌ट्ट्या, यात्रा व इतर कारणांमुळे अनेक नागरिक बाहेरगावी जात असल्याने  या काळात चोरी / घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी सुरक्षा उपायांचे पालन करून स्वतःची व आपल्या मालमत्तेची सुरक्षा सुनिश्चित करावी, असे आवाहन अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनी केले आहे. 
    अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनच्या वतीने काढण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात शरद जोगदंड यांनी म्हंटले आहे की, नागरिकांनी बाहेरगावी जाताना घर व्यवस्थित लॉक करुनच निघावे. शक्य असल्यास डबल लॉकचा वापर करावा.
◆ घर बंद राहणार असल्यास विश्वासू शेजारी, मित्र किंवा नातेवाईकांना माहिती देऊन घरावर लक्ष ठेवण्यास सांगावे.
◆ सोशल मीडियावर प्रवास, महल किंवा “घर बंद आहे अशा प्रकारची माहिती पोस्ट करणे टाळावे.
◆ घरात मोठ्या प्रमाणात रॊकड, दागिने किंवा मौल्यवान वस्तू ठेवणे टाळून त्या बँक लॉकरमध्ये सुरक्षित ठेवाव्यात.
◆ घर परिसरात CCTV कॅमेरे, सेन्सर लाईट किंवा अलार्म सिस्टम वसविण्यास प्राधान्य द्यावे.
◆ रात्रीच्या वेळी घराच्या परिसरात पुरेसा प्रकाश राहील याची काळजी घ्यावी.
घराजवळ अनोळखी व्यक्ती रेकी करत असल्याचा संशय आल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी.
घरकामासाठी, वॉचमन किंवा भाडेकरू ठेवताना संबंधित व्यक्तींची पोलीस पडताळणी करून घ्यावी.
दीर्घकाळ घर बंद राहणार असल्यास पत्रपेटीत वर्तमानपत्रे, बिल किंवा जाहिराती साचून राहणार नाहीत याची व्यवस्था करावी.
◆ घरातील गॅस, वीज उपकरणे व इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू बंद असल्याची खात्री करूनच बाहेर पडावे.
वाहन घराबाहेर पार्क करताना स्टेअरिंग लॉक, व्हील लॉक किंवा इतर सुरक्षा साधनांचा वापर करावा.
◆ATM PIN, OTP, बँक खाते क्रमांक किंवा वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नये.
प्रवासा दरम्यान अनोळखी व्यक्तीकडून खाण्याचे पदार्थ किंवा पेय स्वीकारू नयेत.
महिला, ज्येष्ठ नागरिक व एकटे राहणाऱ्या व्यक्तींनी विशेष सतर्क राहावे व आपत्कालीन संपर्क क्रमांक जवळ ठेवावेत.
◆ संशयास्पद व्यक्ती, बेवारस वस्तू किंवा कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास त्वरित स्थानिक पोलीस स्टेशन किंवा डायल 112 वर संपर्क साधावा.
नागरिकांनी ” सतर्क शेजाटी सुरक्षित परिसर’ ही संकल्पना राबवून एकमेकांच्या घरांवर लक्ष ठेवावे.
घरफोडी किंवा चोटीची घटना घडल्यास घटनास्थळातील वस्तूंना हात न लावता त्वरित पोलिसांना माहिती द्यावी, जेणेकरुन वैज्ञानिक तपासास मदत होईल.
नागरिकांनी घर, दुकान, सोसायटी व परिसरातील CCTV कॅमेरे कार्यरत स्थितीत ठेवावेत व त्यांचे फुटेज वेळोवेळी तपासावे.
◆ बस, रेल्वे किंवा सार्वजनिक प्रवासादरम्यान दागिने, रोकड किंवा मौल्यवान वस्तू असलेली पर्स / बॅग ही कोणाच्याही महज लक्षात येणार नाही अशा सुरक्षित ठिकाणी ठेवावी व ती स्वतःच्या किंवा जबाबदार व्यक्तीच्या जवळच ठेवावी.
◆शक्यतो मोठ्या प्रमाणात दागिने जवळ बाळगणे टाळावे.
◆ गर्दीच्या ठिकाणी मोवाईल, पर्स, दागिने व मौल्यवान वस्तूंबाबत विशेष सतर्क राहावे. पाकीटमार व चोरट्यांपासून सावध राहावे.
◆ घरासमोर किंवा परिसरात संशयित वाहन अथवा व्यक्ती वारंवार फिरताना दिसल्यास संबंधित वाहनाचा नंबर नोट करून त्वरित पोलिसांना माहिती द्यावी.
    असे आवाहन अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!