अंबाजोगाईत एटीएम फोडून चोरीचा प्रयत्न; अज्ञात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
अंबाजोगाईत एटीएम फोडून चोरीचा प्रयत्न; अज्ञात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
अंबाजोगाई | प्रतिनिधी
अंबाजोगाई शहरातील भगवानबाबा चौक परिसरात असलेल्या एटीएम मशीनचे लॉक व बॅक कव्हर तोडून चोरीचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी दोन अज्ञात इसमांविरुद्ध अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भिमराव अंबादास घवघवे (वय ३८, व्यवसाय – खासगी नोकरी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही घटना ३ जुलै २०२६ रोजी पहाटे २.१३ वाजण्याच्या सुमारास भगवानबाबा चौक येथील एटीएममध्ये घडली.
अज्ञात आरोपींनी एटीएम मशीनचे बॅक कव्हर, लॉक व इतर भाग तोडून मशीन उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, रोख रक्कम चोरी करण्यात त्यांना यश आले नाही. तरीही या प्रकारामुळे एटीएम मशीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २७५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३०३(२), ६२, ३२४(३)(५) अंतर्गत दोन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षकं शरद जोगदंड यांच्या मार्गदर्शना खाली पुढील तपास सुरु आहे.


