ताज्या घडामोडी

स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभागाच्या चैनल गेटला चाळीस वर्षीय इसमाचा गळफास घेण्याचा प्रयत्न

स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभागाच्या चैनल गेटला चाळीस वर्षीय इसमाचा गळफास घेण्याचा प्रयत्न

अंबाजोगाई (प्रतिनिधी )
    अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागाला असलेल्या चैनल गेटच्या मध्यभागी सोबत आणलेल्या शालीने तीन-चार गाठी बांधून 
विष्णू कुंभार या दारूच्या नशेतील व्यक्तीने आज पहाटे आत्महत्येचा प्रयत्न केला मात्र नजीकच्या काही सजग नागरिकांमुळे तो यशस्वी झाला असून विष्णू कुंभार यावर उपचार सुरू आहेत.
     याविषयी प्राप्त माहिती अशी धारूर तालुक्यातील रहिवासी असलेला विष्णू कुंभार हा व्यक्ती आज पहाटेच्या चार वाजण्याच्या सुमारास दारूच्या नशेत अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागात आला आणि त्याने आपणास त्रास होत असल्याचे डॉक्टरांना सांगितले. डॉक्टरांनी त्याची  तपासणी करून गोळ्या देऊन परत पाठवले. मात्र तो परत न जाता बाहेरून विभागाच्या चॅनल गेट नजीक जाऊन बसला आणि कोणाला काही करण्या अगोदरच त्याने चॅनल गेटच्या मध्यभागी सोबत आणलेल्या शालिच्या साह्याने तीन-चार गाठी बांधून गळफास घेण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार काही अंतरावर असलेल्या गौतम तिवारी व संदीप निकम या सजग नागरिकांनी पाहून तात्काळ चैनल गेट कडे धाव घेऊन त्याला खाली काढले आणि तात्काळ उपचारार्थ दाखल केले.
      दरम्यान या घटनेनंतर पुन्हा स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील सुरक्षा रक्षकाकडून होत असलेल्या हलगर्जीपणाचा नमुना समोर आला आहे.
        

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!