अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांच्या हाती लागलेल्या शेळ्या चोरणाऱ्या टोळीचे सुरेश कुमार कदम यांच्या शेळ्या चोरीचे कनेक्शन असण्याची शक्यता
अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांच्या हाती लागलेल्या शेळ्या चोरणाऱ्या टोळीचे सुरेश कुमार कदम यांच्या शेळ्या चोरीचे कनेक्शन असण्याची शक्यता

अंबाजोगाई:
अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांच्या हाती लागलेल्या शेळ्या चोरणाऱ्या टोळीचे अंबाजोगाई बीड रोड वरील सुरेश कुमार रमेशराव कदम यांच्या शेळ्या चोरीचे कनेक्शन समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या विषयी प्राप्त माहिती अशी की, अंबाजोगाई बीड रोड वरील चनई शिवारातील रस्त्यालगत हॉटेल शिवनेरीच्या समोर सुरेशकुमार रमेशराव कदम यांचे गट क्र. ३५५ मध्ये शेत आहे. ते शेतीसोबतच ‘दादा गोट फार्म’ नावाचा शेळीपालनाचा व्यवसाय करतात. ३० एप्रिल २०२६ रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास त्यांचे वडील शेळ्यांची राखण करण्यासाठी फार्मवर गेले होते. नेहमीप्रमाणे शेळ्यांची पाहणी करून ते शेडसमोर झोपले. मात्र, १ मे २०२६ रोजी सकाळी ६ वाजता त्यांना शेडमधील तीन शेळ्या आणि तीन बोकडे गायब असल्याचे दिसले.
शेडच्या मागच्या बाजूची जाळी कापून चोरट्यांनी आत प्रवेश केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. चोरट्यांनी फार्ममधून बिट्टल जातीच्या एकूण ६ जनावरांचा माल लंपास केला. चोरीला गेलेल्या या जनावरांची एकूण किंमत ९५,००० रुपये आहे.
सुरेशकुमार कदम यांच्या तक्रारीवरून अंबाजोगाई शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस निरीक्षक शरद बाबूराव जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार भागवत व्यंकटराव कांदे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
दरम्यानच्या काळात अंबाजोगाई तालुक्यातील डोंगर पिंपळा येथील शेळ्या एम एच 02 ई आर 6343 या स्विफ्ट डिझायर गाडी मधुन चोरून घेऊन भरधाव वेगाने घेऊन जात असताना चनई नजिक दुर्देवाने या डिझायरचे टायर फुटले आणि गाडी सोडून चालक व आतील लोक फरार झाले.
या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल होऊन पोलीस निरीक्षक मुरलीधर खोकले यांनी तपास केला असता सदर गाडी ही आडस येथील राहिवासी सूरज शिवशंकर इंगवले
यांची असून आरोपी मुन्ना तय्यब पठाण याने आपल्या आईला दवाखान्यात न्यायचे आहे असे खोटे सांगुन गाडी नेल्याचे सूरज इंगवले याचे म्हणणे आहे.
या प्रकरणी मुन्ना पठाण सह अन्य तीन जनावर गुन्हा दाखल असून आरोपी फरार आहे.
दरम्यान अंबाजोगाई शहरात याचं दरम्यान सुरेश कुमार कदम यांच्या सह पत्रकार शेख मुशीर बाबा यांच्या ही 2 शेळ्या चोरीस गेल्या असून डोंगर पिंपळा येथील शेळ्या चोरणारा मुन्ना पठाण व त्यांच्या टोळीचे अंबाजोगाई शहरातील शेळ्या चोरीशी कनेक्शन असण्याची शक्यता असल्याने अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनी त्या बाजूने तपास केल्यास निश्चित पणे सत्य बाहेर येऊन आरोपी व शेळ्या हाती लागल्या शिवाय राहणार नाहीत हे मात्र निश्चित.


