अंबाजोगाईतील अतिक्रमण हटाव मोहीम कायदेशीर तरतुदींनुसारच; सार्वजनिक बांधकाम विभागाचे स्पष्टीकरण नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये; शहराच्या विकासासाठी सहकार्य करण्याचे आवाहन
अंबाजोगाईतील अतिक्रमण हटाव मोहीम कायदेशीर तरतुदींनुसारच; सार्वजनिक बांधकाम विभागाचे स्पष्टीकरण
नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये; शहराच्या विकासासाठी सहकार्य करण्याचे आवाहन
अंबाजोगाई | प्रतिनिधी
अंबाजोगाई शहरात दि. ३० व ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेली अतिक्रमण हटाव मोहीम कायदेशीर तरतुदी व नियमांनुसारच करण्यात आल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने स्पष्ट केले आहे. या कारवाईबाबत समाजमाध्यमांवर चुकीच्या अफवा पसरवू नयेत तसेच नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण करू नयेत, असे आवाहन विभागाच्या वतीने कार्यकारी अभियंता गो प्र स्वामी यांनी केले आहे.
अंबाजोगाई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय जाणारा रोड, शासकीय विश्राम गृह ते सदरबाजार आणि अण्णाभाऊ साठे चौक ते मांडवा रोड वरती दि. ३० व ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली असून ही मोहीम
कायदेशीर तरतुदी व नियमांनुसारच करण्यात आल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता (गो. प्र. स्वामी) यांनी दि. १ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात अतिक्रमण हटाव मोहिमेबाबत सविस्तर भूमिका मांडली आहे.
महाराष्ट्र महामार्ग अधिनियम १९५५, महाराष्ट्र महसूल अधिनियम १९६६, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता २०२० तसेच नगर विकास विभागाच्या दि. ५ ऑगस्ट २०१९ च्या शासन निर्णयातील तरतुदींच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय, अन्य शहरांतील राज्य रस्त्यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तसेच नगर परिषद बांधकाम परवान्यांच्या नियम व अटींच्या अधीन राहून, कायदेशीर तरतुदींनुसार अतिक्रमणे हटविण्यात आल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.
*अफवांवर विश्वास न ठेv
अतिक्रमण हटाव मोहिमेबाबत समाजमाध्यमां मध्ये चुकीच्या अफवा पसरवू नयेत. तसेच जनतेमध्ये गैरसमज निर्माण करून सार्वजनिक कामकाजा बाबत संभ्रम निर्माण करू नये, असे आवाहन पत्रकातून करण्यात आले आहे.
अतिक्रमण हटाव मोहिमेबाबत समाजमाध्यमां मध्ये चुकीच्या अफवा पसरवू नयेत. तसेच जनतेमध्ये गैरसमज निर्माण करून सार्वजनिक कामकाजा बाबत संभ्रम निर्माण करू नये, असे आवाहन पत्रकातून करण्यात आले आहे.
सदर कारवाई ही रस्ता सुरक्षा आणि वाहतूक सुरळीत राहण्यासाठी तसेच जनतेच्या हितासाठी करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता वस्तुस्थिती समजून घ्यावी आणि अंबाजोगाई शहराच्या सार्वजनिक विकासासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात आले आहे


