Thursday, October 8, 2026
Latest:
ताज्या घडामोडी

नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थिनीची छेडछाड, आरोपी विरुद्ध विनयभंगा सह  ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल आरोपी अटक 

नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थिनीची छेडछाड, आरोपी विरुद्ध विनयभंगा सह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल आरोपी अटक 

अंबाजोगाई : (प्रतिनिधी)

  अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात एका २० वर्षीय विवाहित तरुणीने दिलेल्या जबाबात महाविद्यालयीन काळातील ओळखीच्या तरुणाकडून प्रेमसंबंधासाठी पाठलाग व त्रास दिल्याचा आरोप केला आहे. याबाबतचा जबाब तिने दि. ६ ऑक्टोबर २०२६ रोजी पोलिसांसमोर नोंदविला आहे.

    तरुणीच्या जबाबानुसार, तिचे शिक्षण अंबाजोगाई येथील नर्सिंग महाविद्यालयात सुरू असताना तिची कृष्णा मारुती केंद्रे याच्यासह काही विद्यार्थ्यांशी मैत्री होती. महाविद्यालयीन ओळखीचा फायदा घेत कृष्णा याने दि. १ जानेवारी २०२५ रोजी सार्वजनिक ठिकाणी प्रेम करण्याबाबत विचारणा केली होती. मात्र, तिने त्यास नकार दिल्यानंतरही तो वारंवार पाठलाग करून त्रास देत असल्याचे तिने जबाबात नमूद केले आहे.

    तसेच, “तू सतरा पोरांना फिरवतेस व मला प्रेम करण्या बाबत नाही बोलतेस ” अशा स्वरूपाचे बोलणे केल्याचा आरोपही तरुणीने केला आहे. महाविद्यालयात मुलींबाबत तसेच तिच्याबाबत काही टिप्पणी केल्याने तिने संबंधित विद्यार्थिनीला याची माहिती दिल्याचेही जबाबात म्हटले आहे.

    सध्या संबंधित विदयार्थिनीने नर्सिंग शिक्षण बंद केले असून कृष्णा केंद्रे याच्याशी कोणताही संपर्क नसल्याचे तरुणीने स्पष्ट केले आहे.

      याप्रकरणी सदर पीडित विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनमध्ये विनयभंगासह ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल करण्यात आला असून 

या प्रकरणातील आरोपीस अटक करण्यात आले असून उपविभागीय पोलीस अधिकारी ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांकडून तपास सुरु  आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!