Skip to content
बारा दिवसापूर्वीच विवाहबद्ध झालेल्या गणेश कोळी नामक तलाठ्याची आंबेजोगाई शहरात आत्महत्या

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
बारा दिवसापूर्वी विवाहबद्ध झालेल्या आणि व्यवसायाने तलाठी असलेल्या गणेश दत्तू कोळी याने आज दुपारी अंबाजोगाई शहरा नजिक असलेल्या मोरेवाडी परिसरात तो राहत असलेल्या ज्योतीराम दळवे यांच्या घरातील रूममध्ये गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.
याविषयी प्राप्त माहिती अशी की औसा तालुक्यातील नांदुर्गा येथील रहिवासी असलेल्या आणि सद्यस्थितीमध्ये चंद्रपूर महसूल विभागात तलाठी या पदावर कार्यरत असलेल्या गणेश दत्तू कोळी याचा बीड येथील राहिवासी असलेल्या व सध्या अंबाजोगाई येथील अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाशी संलग्न असलेल्या फॉरेन्सिक डिपारमेंट मध्ये कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या दिपाली हिच्या सोबत 12 दिवसा पूर्वी म्हणजे 13 मे 2026 रोजी बीड या ठिकाणी विवाह झाला होता.
गणेश व दिपाली कोळी यांनी राहण्या साठी अंबाजोगाई शहरा नजीक असलेल्या मोरेवाडी परिसरातील रहिवाशी ज्योतीराम दळवे यांच्याकडे स्लॅबची रूम भाड्याने घेतली होती. दिपाली व गणेश यांच्या विवाहास केवळ 12 दिवस लोटले असताना या 12 दिवसात असं काय घडलं कोण जाने त्यांच्या नव्याने फुलू लागलेल्या संसारास दृष्ट लागली आणि गणेश याने आज सोमवारी दुपारी दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास पत्नी ड्युटीवर गेलेली असताना व रूममध्ये कोणीही नसताना गणेश कोळी यांनी स्लॅबला असलेल्या लोखंडी हुकला दोर लावून गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली.
याप्रकरणी अद्याप पोलिसात गुन्हा दाखल झालेला नसून उद्या शवविच्छेदनानंतर गुन्हा दाखल होईल असा अंदाज असून आत्महत्येचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे.
Post Views: 469
error: Content is protected !!