Wednesday, May 13, 2026
Latest:
ताज्या घडामोडी

NEET Exam  नीट परीक्षा रद्द होताच NTA चा मोठा निर्णय, विद्यार्थी-पालकांसाठी सर्वात महत्वपूर्ण निर्णय 

NEET Exam  नीट परीक्षा रद्द होताच NTA चा मोठा निर्णय, विद्यार्थी-पालकांसाठी सर्वात महत्वपूर्ण निर्णय 

    नीट परीक्षेत पेपरफुटीचे प्रकरण समोर आल्यानंतर ही परीक्षा रद्द झाली आहे. त्यानंतर आता NTA ने एक पत्रक जारी करत विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाची माहिती दिली आहे.

    नीट परीक्षेत पेपरफुटीचे प्रकरण समोर आल्यानंतर ही परीक्षा रद्द करण्यात आली आसुन आता नॅशनल टेस्टिंग एजन्सीने 10 मे 2026 रोजी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकाच्या पुढील भाग प्रसिद्ध केला आहे. यात विद्यार्थी, पालक आणि सर्वसामान्य नागरिकांना NEET (UG) 2026 संदर्भात घेण्यात आलेल्या पुढील निर्णयांची माहिती देण्यात आली आहे.

   NEET (UG) 2026 परीक्षा रद्द केंद्रीय यंत्रणांशी समन्वय साधून NTA ने तपासलेल्या माहितीनुसार तसेच कायदा अंमलबजावणी यंत्रणांनी शेअर केलेल्या निष्कर्षांच्या आधारे, आणि परीक्षापद्धतीत पारदर्शकता राखण्यासाठी, भारत सरकारच्या मंजुरीनंतर NTA ने 3 मे 2026 रोजी घेण्यात आलेली NEET (UG) 2026 परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ही परीक्षा पुन्हा घेतली जाणार असून त्याच्या तारखा स्वतंत्रपणे जाहीर केल्या जाणार आहेत. NTA ला प्राप्त झालेली माहिता आणि तपास यंत्रणांचे निष्कर्ष पाहता सध्याची परीक्षा प्रक्रिया कायम ठेवणे शक्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पुनर्परीक्षेच्या तारखा तसेच नव्याने प्रवेशपत्र जारी करण्याचे वेळापत्रक येत्या काही दिवसांत जारी केले जाणार आहे.

CBI चौकशीचा निर्णय

भारत सरकारने या प्रकरणातील आरोपांची सखोल चौकशी करण्यासाठी हे प्रकरण सेंट्रल ब्युरो ऑफ इन्वेस्टिगेशन (CBI) कडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. NTA या चौकशीस पूर्ण सहकार्य करेल आणि आवश्यक सर्व कागदपत्रे, नोंदी व मदत उपलब्ध करून देणार आहे.

विद्यार्थ्यांच्या हितासाठी निर्णय

राष्ट्रीय परीक्षा प्रणालीवरील विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा विश्वास कायम राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पुनर्परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मोठा त्रास होईल याची NTA ला जाणीव आहे आणि या परिणामाकडे संस्था हलक्यात पाहत नाही. मात्र, परीक्षा कायम ठेवल्यास या विश्वासाला अधिक गंभीर आणि दीर्घकालीन धक्का बसला असता, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असही पत्रकात नमूद करण्यात आलं आहे.

नव्याने नोंदणीची गरज नाही

मे 2026 सत्रातील नोंदणी माहिती, उमेदवारी आणि निवडलेली परीक्षा केंद्रे पुनर्परीक्षेसाठी कायम ठेवली जातील. विद्यार्थ्यांना नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही आणि कोणतेही अतिरिक्त परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही. याशिवाय विद्यार्थ्यांनी भरलेली परीक्षा फी परत केली जाईल आणि पुनर्परीक्षा NTA च्या अंतर्गत संसाधनांद्वारे घेतली जाईल. मराठी

अधिकृत माहितीकडेच लक्ष द्या

NEET पुनर्परीक्षेच्या तारखा आणि नव्याने प्रवेशपत्र जारी करण्याचे वेळापत्रक यासह पुढील सर्व माहिती NTA च्या अधिकृत माध्यमांद्वारे प्रसिद्ध केली जाईल. विद्यार्थी आणि पालकांनी केवळ अधिकृत माहितींवर विश्वास ठेवावा आणि सोशल मीडियावर फिरणाऱ्या अप्रमाणित बातम्यांकडे दुर्लक्ष करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!