ताज्या घडामोडी

*अंबाजोगाई मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या निवडणुकीत परिवर्तन पॅनलचा दणदणीत विजय*

*अंबाजोगाई मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या निवडणुकीत परिवर्तन पॅनलचा दणदणीत विजय*


====================
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
अंबाजोगाई मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या निवडणुका अंबाजोगाईत नुकत्याच घेण्यात आल्या. या निवडणुकीमध्ये परिवर्तन पॅनलच्या नवख्या उमेदवारांनी बहुमताने विजय प्राप्त करीत विजयाचा चौकार मारला. या निवडणुकीनंतर झालेल्या अंबाजोगाई मेडीकल प्रॅक्टीशनर्स असोसिएशनच्या सर्वसाधारण सभेत नवीन कार्यकारिणीची दोन वर्षे कालावधीसाठी निवड करण्यात आली. यावेळी सर्वानुमते कार्यकारीणी निवडण्यात आली. या नूतन कार्यकारणी मध्ये पदाधिकारी म्हणून अध्यक्षपदी डॉ.निशिकांत पाचेगावकर, उपाध्यक्षपदी डॉ.प्रिया मुळे, सचिवपदी डॉ.संदीप जोगदंड, सहसचिवपदी डॉ.नजीर, अस्लम खान, डॉ.इम्रान पटेल तसेच कोषाध्यक्षपदी डॉ.स्वाती हारे, क्रीडा सचिवपदी डॉ.वेणुगोपाल आगळे, डॉ.पूजा लोमटे, सांस्कृतिक समिती सचिवपदी डॉ‌.सचिन कस्तुरे, डॉ.स्नेहल पेस्टे, कार्यकारिणी सदस्य म्हणून डॉ.शिवाजी मस्के, डॉ.प्रवीण जोशी यांची निवड करण्यात आली. निवडणुका झाल्यानंतर परिवर्तन पॅनलच्या वतीने डॉ.राजेश इंगोले, डॉ.प्रशांत पाटील, डॉ.अतुल देशपांडे, डॉ.सुलभा पाटील, डॉ.प्रल्हाद गुरव, डॉ इम्रान अली, डॉ.प्रदीप सोनवणे, डॉ.योगेश मुळे, डॉ.संदीप जैन, डॉ.देवराव चामणर, डॉ.बाळासाहेब हाके, डॉ.सुमित केंद्रे, डॉ.सुनील नांदलगावकर, डॉ.बळीराम मुंडे, डॉ.विजय लाड या पॅनलच्या प्रवर्तकांनी सर्व मतदारांचे आभार मानले आणि निवडून आलेल्या सर्व उमेदवारांचे शाल, श्रीफळ देवून फेटा बांधून आणि गुलाल उधळून सत्कार केला.

====================

====================

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!