Skip to content
“स्व.आडसकर” आजही त्यांच्या कार्यातून अमर – रमेशराव आडसकर
——-
स्व.बाबुरावजी आडसकर मरणोत्तर रोटरी भूषण पुरस्काराने सन्मानित

अंबाजोगाई -: स्व. बाबुरावजी आडसकर आजही त्यांच्या केलेल्या कार्यातून अमर आहेत. रोटरी क्लबने त्यांच्या कार्य कृत्वाचा गौरव करून त्यांच्या आठवणी जागृत केल्या. असे ऋणनिर्देश अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष रमेशराव आडसकर यांनी व्यक्त केले.
येथील रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी यांच्या वतीने लोकनेते स्व. बाबुरावजी आडसकर यांना मरणोत्तर रोटरी भूषण जाहीर केला. व हा पुरस्कार रमेशराव आडसकर यांना प्रदान केला. यावेळी रोटरीचे ऋण व्यक्त करताना रमेशराव आडसकर बोलत होते.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून रोटरीचे भावी प्रांतपाल क्षितिज झावरे,उप प्रांतपाल मेघराज पिंपळे, रोटरीचे अध्यक्ष शकील शेख, सचिव राधेश्याम लोहिया, मावळत्या अध्यक्ष प्रा.रोहिणी पाठक,सचिव मंजुषा जोशी यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
या वेळी बोलताना रमेशराव आडसकर म्हणाले की सलग ५० वर्षे आडसकर साहेबांनी राजकारण नव्हे तर जनसेवा केली. या भागातील अनेक प्रश्न व समस्या त्यांनी मार्गी लावल्या. अनेक कुटुंबांना रोजगार उपलब्ध करून दिला. त्यांच्या कार्याचा वारसा आम्ही पुढे नेत आहोत. रोटरी क्लबने हा सन्मान बहाल करून त्यांच्या स्मृतीस उजाळा दिला. अशा शब्दात आडसकर यांनी या सत्काराला उत्तर दिले.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल,श्रीफळ,सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, देऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सर्व आडसकर कुटुंबीय हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावर उपस्थित होते.
सन्मानपत्राचे वाचन अविनाश मुडेगावकर यांनी केले.कार्यक्रमाचे संचलन डॉ. प्रिया तिडके, वसुधा गडसिंग यांनी केले.तर उपस्थितांचे आभार राधेश्याम लोहिया यांनी मानले. या कार्यक्रमास मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Post Views: 169
error: Content is protected !!