ताज्या घडामोडी

अंबाजोगाईत जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; चार जण अटकेत, २.०८ लाखांचा मुद्देमाल जप्त

अंबाजोगाईत जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; चार जण अटकेत, २.०८ लाखांचा मुद्देमाल जप्त

अंबाजोगाई | प्रतिनिधी :
   अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने शहरालगतच्या शेपवाडी शिवारातील अजय हॉटेलच्या पाठी मागील परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून चार जणांना रंगेहात पकडले. या कारवाईत रोख रक्कम, चार मोबाईल फोन, दोन दुचाकी आणि जुगाराचे साहित्य असा एकूण २ लाख ८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम, १८८७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ जुलै २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५.३० वाजण्याच्या सुमारास शेवडी शिवारातील अजय हॉटेलच्या पाठीमागील मोकळ्या जागेत काहीजण पैशांवर तिरट जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने सापळा रचून सायंकाळी सुमारे ७.४५ वाजता छापा टाकला.
    या कारवाईत प्रेम शिवाजी जाधव (रा. पुस, नागझरी परिसर), अतिक फारूक शेख, मयूर मधुकर भिसे आणि मयूर लहू गोरे (रा. पिंपळा धायगुडा, ता. अंबाजोगाई) यांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींकडून रोख रक्कम, चार मोबाईल फोन, दोन मोटारसायकली तसेच तिरट जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत २ लाख ८ हजार ८०० रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी घटनास्थळावरून जुगारासाठी वापरण्यात येणारे तिरट जुगाराचे साहित्यही जप्त केले असून, आरोपी गोलाकार बसून पैशांची हार-जीत लावत जुगार खेळत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सर्व आरोपींविरुद्ध गुन्हा क्रमांक ३०५/२०२६ अन्वये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम, १८८७ च्या कलम १२(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    सदर कारवाई पोलीस अंमलदार प्रमोद चाटे, पोहेकॉ नागनाथ मुंडे यांनी केली असून, पोलीस निरीक्षक शरद जोगदंड  यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!