परळीच्या गौशिया शेख यांची महाराष्ट्र पोलीस मुंबई दलात निवड
परळीच्या गौशिया शेख यांची महाराष्ट्र पोलीस मुंबई दलात निवड

अंबाजोगाई | प्रतिनिधी
परळी येथील गरीब कुटुंबातील गौशिया सादेक शेख यांनी जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर महाराष्ट्र पोलीस मुंबई दलात स्थान मिळवले आहे.
आर्थिक अडचणी आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न पूर्ण केले. अभ्यासासोबतच शारीरिक तयारीवर सातत्याने मेहनत घेत त्यांनी हे यश संपादन केले.
गौशिया यांच्या निवडीमुळे शेख कुटुंबासह परळी शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.
त्यांच्या यशामुळे “परिस्थितीपेक्षा जिद्द मोठी असते” हा संदेश तरुण-तरुणींना मिळाला असून त्यांच्या पुढील सेवाभावी वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


