Skip to content
अंबाजोगाई वकील संघाच्या निवडणुकी मध्ये कै. ऍड. अण्णासाहेब लोमटे यांच्या विचाराशी प्रेरीत एकता पॅनलचे सर्वच्या सर्व उमेदवार बहूमताने विजयी

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
अंबाजोगाई वकील संघाच्या निवडणुकी मध्ये कै. ऍड. अण्णासाहेब लोमटे यांच्या विचाराशी प्रेरीत एकता पॅनलचे सर्वच्या सर्व उमेदवार बहूमताने विजयी झाले असून विजयी उमेदवारात ऍड अशोक कवडे, ऍड फारूक उस्मानी, ऍड.राजकुमार चौरे, ऍड स्नेहल नागरगोजे, ऍड प्रवीण पेडगावकर, ऍड अक्षय कांबळे यांचा समावेश आहे.
प्रति वर्षां प्रमाणे याही वर्षी अंबाजोगाई वकील संघांची निवडणूक सोमवारी अत्यंत खेळी मेळीच्या वातावरणात संपन्न झाली. या निवडणुकीत 452 मतदारा पैकी 408 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
या निवडणुकीत कै. अण्णा साहेब लोमटे यांच्या विचाराशी प्रेरीत असलेल्या व ऍड. किशोर गिरवलकर, ऍड विष्णुपंत सोळंके, ऍड एस जी चिखलीकर, ऍड. डी. व्ही. चौधरी, ऍड अजित बापू देशमुख, ऍड व्ही डी शिंदे यांच्या मार्गदर्शना खाली निवडणुक रिंगणात उतरलेले सर्वच्या सर्व उमेदवार विजयी झाले.
या निवडणुक रिंगणात उतरलेले व विजयी झालेले उमेदवार या प्रमाणे
१) अध्यक्ष
ऍड अशोक कवडे- २६४
ऍड कल्याणी विर्धे- १३०
ऍड महादेव मुदगलकर-८
ऍड विशाल घोबाळे-३
ऍड पद्मा कुपकर-१
बाद मतदान-२
ऍड अशोक कवडे १३४ मतांनी विजयी
२) उपाध्यक्ष
ऍड फारुख उस्मानी-२१९
ऍड कैलास चामणर-१८३
बाद मतदान-७
ऍड फारुख उस्मानी ३७ मतांनी विजयी
३) उपाध्यक्ष (महिला)
ऍड मनीषा रुपनर-२१४
ऍड अमिता साळवे-१८६
बाद मतदान-८
ऍड मनीषा रुपनर २८ मतांनी विजयी
४) सचिव
ऍड राजकुमार चौरे-१५३
ऍड पृथ्वीराज कदम-१५०
ऍड हनुमंत अकाते-१०२
बाद मतदान-३
गहाळ मतपत्रिका-२
ऍड राजकुमार चौरे-०३ मतांनी विजयी
५) सहसचिव (महिला)
ऍड स्नेहल नागरगोजे-२५२
ऍड छाया देहरे-१४८
बाद मतदान-७
गहाळ मतपत्रिका-१
ऍड स्नेहल नागरगोजे ११४ मतांनी विजयी
६) ग्रंथपाल
ऍड प्रवीण पेडगावकर-२३८
ऍड चंद्रकांत मुंडे-१६३
बाद मतदान-३
गहाळ मतपत्रिका-४
ऍड प्रवीण पेडगावकर ७५ मतांनी विजयी
६) कोषाध्यक्ष
ऍड अक्षय कामळे-२४४
ऍड खमर शेख-१५७
बाद मतदान-६
गहाळ मतपत्रिका-१
ऍड अक्षय कामळे ८७ मतांनी विजयी
निवडणूक निकाल जाहीर होताच सर्व सदस्यांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची अतिश बाजी करून आंदोत्सव साजरा केला. सर्व विजयी उमेदवारांचे सर्वत्र अभिनंदन होतं आहे.
निवडणूक निर्णय अधीकारी म्हणून
ऍड आर आर निर्मळे व सहाय्यक निवडणूक अधीकारी श्री सिद्धेश्वर शिवलिंग स्वामी यांनी काम पाहिले.
Post Views: 208
error: Content is protected !!