*महापुरूषांच्या जीवनावर आधारित सामान्यज्ञान व चित्रकला स्पर्धेत 100 विद्यार्थी सहभागी* *महात्मा ज्योतिराव फुले स्मारक समितीचा स्तुत्य उपक्रम*
*महापुरूषांच्या जीवनावर आधारित सामान्यज्ञान व चित्रकला स्पर्धेत 100 विद्यार्थी सहभागी*
*महात्मा ज्योतिराव फुले स्मारक समितीचा स्तुत्य उपक्रम*

=====================
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
येथील महात्मा ज्योतिराव फुले स्मारक समितीच्या वतीने महापुरूषांच्या जीवनावर आधारित असलेल्या सामान्यज्ञान स्पर्धा तसेच चित्रकला स्पर्धेचे आयोजन महात्मा फुले स्मारक स्थळी करण्यात आले होते. यावेळी तब्बल 100 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उस्फूर्तपणे सहभाग नोंदवला.
या प्रबोधनात्मक स्पर्धा परीक्षांचे उद्घाटन महात्मा फुले स्मारक समितीचे अध्यक्ष सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना डॉ.राजेश इंगोले यांनी महापुरूषांच्या मिरवणुका जयंत्या तर निघाल्याच पाहिजेत परंतु, त्यासोबतच त्या महापुरूषांनी आपल्या जीवनामध्ये काय केले आहे, त्यांच्या विचारांचा समाजाला कशाप्रकारे उपयोग होऊ शकतो, त्यांचे जीवन चरित्र कशा प्रकारचे होते, या गोष्टी सुद्धा समाजाला, विद्यार्थ्यांना समजल्या पाहिजेत. महात्मा ज्योतिराव फुले यांनी क्रांतीची सुरूवात केली व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य समता बंधुता व न्यायिक हक्कांची चळवळ उभा केली. या महापुरूषांनी समाजाशिक्षित असावा समाजामध्ये कोणावरही अन्याय होऊ नाही यासाठी समाजाने सजग असले पाहिजे समाज विज्ञानवादी बुद्धीप्रामाण्यवादी असला पाहिजे, आणि शासनकर्ती जमात बनण्यासाठी सिद्ध असला पाहिजे हे स्वप्न पाहिले होते या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी या महापुरूषांचे विचार समजून घेऊन त्याचे प्रत्यक्ष जीवनामध्ये कशाप्रकारे आचरण करता येईल यासाठी प्रत्येक व्यक्तीने प्रयत्न केला पाहिजे हा हेतू ठेवून महात्मा फुले स्मारक समितीतर्फे दरवर्षी अशा प्रकारच्या जनप्रबोधनात्मक विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे शैक्षणिक व सांस्कृतिक विचार मंच निर्माण केला आहे दरवर्षी या स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे असे सांगितले. महात्मा फुले स्मारक समिती तर्फे या विविध स्पर्धांचे प्रकल्प संचालक म्हणून सचिव रत्नदीप गोरे, प्रा.डॉ.मिलिंद ढगे या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेत आहेत. यावेळी महात्मा फुले स्मारक समितीचे पदाधिकारी प्रा.अनिल नरसिंगे, संजय साळवे, विजय कचरे, सुनील नरसिंगे, प्रा.डॉ.किरण चक्रे, रामेश्वर खाडे, भाऊराव गवळी इत्यादी उपस्थित होते.
====================
=====================


