Skip to content
*योगेश्वरी पॉलिटेक्निकमध्ये कॅम्पस मुलाखतीत ५० विद्यार्थ्यांना नोकरी*

अंबाजोगाई.:- तंत्रशिक्षणात महाराष्ट्रात अग्रेसर असणाऱ्या अंबाजोगाई येथील योगेश्वरी शिक्षण संस्था संचलित कृष्णाजी पुरुषोत्तम चौसाळकर योगेश्वरी पॉलिटेक्निक या संस्थेत तृतीय वर्षात शिकणा-या विद्यार्थ्यांची अभ्यास क्रमातील शेवटचे सत्र संपण्यापूर्वीच कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीसाठी निवड झाल्याने पालकवर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
योगेश्वरी पॉलिटेक्निक या संस्थेत स्थापन झालेल्या ट्रेनिंग प्लेसमेंट सेलतर्फे विद्यार्थ्यांसाठी औद्योगिक क्षेत्रातील विविध नामांकित कंपन्यांशी संपर्क साधून त्यांना हवे असलेले मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येते. सेलतर्फे विद्यार्थ्यांसाठी अभ्यासादरम्यान नामांकित कंपन्यांच्या प्रतिनिधींची मार्गदर्शन शिबिरेही घेतली जातात.
पुणे येथील नामांकित सुंगवू हायटेक प्रायव्हेट लिमिटेड,लुकास टीव्ही,अद्विक हायटेक ह्या कंपन्याकरिता कॅम्पस मुलाखती घेण्यात आल्या.यामध्ये तंत्रनिकेतनमधील तृतीय वर्षात शिकणा-या Automobile व Mechanical विभागातील एकूण ५० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली
या कॅम्पस मुलाखतीसाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल व यंत्र अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा. शाम गडदे, ऑटोमोबाईल विभाग प्रमुख प्रा. बप्पासाहेब सोनवणे यांनी मेहनत घेतली.
कॅम्पस मुलाखतीमध्ये निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रशेखर बर्दापूरकर, का. उपाध्यक्ष अॅड. जगदीश चौसाळकर, सचिव श्री कमलाकरराव चौसाळकर, कोषाध्यक्ष डॉ. शैलेश वैद्य, संचालक श्री.प्रताप पवार व योगेश्वरी पॉलिटेक्निकचे प्राचार्य रमण देशपांडे यांनी अभिनंदन केले आहे.
Post Views: 261
error: Content is protected !!