परळीत स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाने 8 लाख 68 हजार रुपयाचे चंदन केले जप्त
परळीत स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाने 8 लाख 68 हजार रुपयाचे चंदन केले जप्त

अंबाजोगाई (प्रतिनिधी )
परळी येथिल रेल्वे पटरी च्या उत्तर बाजूस पालांमध्ये काही इसम चंदनाचे लाकडे तासत आसल्याची गुप्त माहिती मिळाल्या वरुन बीड येथिल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पालावर मारलेल्या छाप्यात 8 लाख 68 हजार रुपयाचे चंदन जप्त केले आहे.
बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यावर कडक कार्यवाही करण्याचे आदेश दिल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, उप निरीक्षक सुशांत सुतळे यांच्या मार्गदर्शना खाली पो हवा रामचंद्र केकान, पोना गोविंद भताने व पो शी सचिन आंधळे यांच्या टीमला दिनांक 23/07/2025 रोजी रात्री परिसरात पेट्रोलिंग करत असताना गोपनीय माहिती मिळाली की, परळी रेल्वे पटरी च्या उत्तर बाजूस पालांमध्ये काही इसम चंदनाचे लाकडे तासत आहेत या गोपनीय माहिती च्या आधारे या टीम ने सापळा रचुन त्या पालावर छापा मारला असता पालातील आरोपी फरार झाले आत मध्ये पाहणी करुन खात्री केली असता आत 217 किलो चंदनाची लाकडे मिळून आली ज्याची किंमत 8 लाख 68 हजार रुपये आहे.
या प्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध परळी येथिल संभाजीनगर पो स्टे मध्ये गु. र.न.155/25.कलम 303(2)3(5)BNS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


