अंबाजोगाईच्या अपर पोलीस अधीक्षकपदी अनमोल मित्तल यांची नियुक्ती
अंबाजोगाईच्या अपर पोलीस अधीक्षकपदी अनमोल मित्तल यांची नियुक्ती
अंबाजोगाई : अंबाजोगाईच्या अपर पोलीस अधीक्षकपदी आयपीएस अधिकारी अनमोल मित्तल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अनमोल मित्तल यापूर्वी ठाणे (ग्रामीण) येथे अपर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. अंबाजोगाईच्या विद्यमान अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांची नागपूर येथे बदली करण्यात आली आहे.
चेतना तिडके यांच्याकडे नागपूर येथील अमली पदार्थ विरोधी अभियानाच्या अधीक्षकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
अनमोल मित्तल यांच्या नियुक्तीमुळे अंबाजोगाईच्या पोलीस प्रशासनाची धुरा आता त्यांच्या हाती येणार आसल्याने व मित्तलं हे आय पी एस अधिकारी असल्याने अंबाजोगाई उप विभागातील कायदा व सुव्यवस्था राखण्या साठी आणखी बळ मिळणार आहे.



