‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत आयोजित विविध स्पर्धांमध्ये माईर एम.आय.टी पुणे संचलित कै.दादाराव कराड विद्यालयाच्या विद्यार्थिनींचे उल्लेखनीय यश
‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत आयोजित विविध स्पर्धांमध्ये माईर एम.आय.टी पुणे संचलित कै.दादाराव कराड विद्यालयाच्या विद्यार्थिनींचे उल्लेखनीय यश

अंबाजोगाई : पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमास मंत्री पंकजाताई मुंडे, आमदार नमिताताई मुंदडा, नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा व अक्षय मुंदडा यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
विकसित भारताच्या संकल्पनेला चालना देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या ‘स्वप्नाचा भारत’ चित्रकला व निबंध स्पर्धेत कै. दादाराव कराड विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन केले.
इयत्ता ४ थी ते ७ वी (छोटा गट) या गटात अदिती दराडे हिने निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक, तर समृद्धी खाडे हिने चित्रकला स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त केला. या दोन्ही विद्यार्थिनींचा प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व रोख पारितोषिक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
विद्यार्थिनींच्या या यशाबद्दल संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, कार्यकारी अध्यक्ष राहुलदादा कराड, कार्यकारी संचालक राजेशजी कराड, शुभांगीताई कराड व प्राचार्य रामराजे कराड यांनी तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवृंदाने विद्यार्थिनींचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थिनींच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे विद्यालयाच्या शैक्षणिक, कलात्मक व सर्जनशील उपक्रमांना नवी ऊर्जा मिळाली असून, त्यांच्या यशाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.


