Skip to content
तीन दिवसांत मिनी गंठण चोरीचा गुन्हा उघडकीस
₹१.५४ लाखांचे मिनी गंठण व गुन्ह्यातील मोटरसायकल हस्तगत; एक आरोपी ताब्यात

अंबाजोगाई : जिजाऊ चौक पाटीजवळ, मोरेवाडी परिसरात महिलेच्या गळ्यातील मिनी गंठण खेचून नेल्याचा गुन्हा अंबाजोगाई शहर पोलिसांनी अवघ्या तीन दिवसांत उघडकीस आणला. सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी धनाजी देविदास शिंदे (वय २६, रा. गंभीरवाडी, ता. कळंब, जि. धाराशिव) यास कळंब येथून मोटरसायकलसह ताब्यात घेतले.
३० ऑगस्ट रोजी आशा भारतराव चौधरी या मोरेवाडी येथून जात असताना मोटरसायकलवरून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी त्यांच्या गळ्यातील मिनी गंठण खेचून नेले होते. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ३५१/२०२६, कलम ३०४, ३(५) BNS अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी तपासादरम्यान परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढला. आरोपीकडून २२ ग्रॅम वजनाचे ₹१ लाख ५४ हजार किमतीचे मिनी गंठण तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल हस्तगत करण्यात आली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अपर पोलीस अधीक्षक चेतना मॅडम व सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद जोगदंड, पोलीस उपनिरीक्षक रमेश घुले, पोलीस हवालदार पांडुरंग काळे व पोलीस अंमलदार हनुमंत चादर यांच्या पथकाने केली.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रमेश घुले करीत आहेत.
Post Views: 256
error: Content is protected !!