Wednesday, September 10, 2025
ताज्या घडामोडी

बीड येथिल स्थानीक गुन्हे शाखेच्या  पथकाने बर्दापूर पोलीस स्टेशन हद्दीत अवैद्य वाळूची वाहतूक करणारा हायवा पकडला, 21 लाख 25 हजार रुपयाचा ऐवज जप्त 

बीड येथिल स्थानीक गुन्हे शाखेच्या  पथकाने बर्दापूर पोलीस स्टेशन हद्दीत अवैद्य वाळूची वाहतूक करणारा हायवा पकडला, 21 लाख 25 हजार रुपयाचा ऐवज जप्त 

अंबाजोगाई 

    बीड येथिल स्थानीक गुन्हे शाखेच्या  पथकाने बर्दापूर पोलीस स्टेशन हद्दीमधील निरपणा शिवारात अवैद्य वाळूची वाहतूक करणारा हायवा पकडून 2 जनावर गुन्हा दाखल केला आसुन त्यांच्या कडून 21 लाख 25 हजार रुपयाचा ऐवज जप्त केला आहे.

      बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत व स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि शिवाजी बंटेवाड यांच्या आदेशानुसार पो उ नि सुशांत सुतळे, हे कॉ  रामचंद्र केकान, हे कॉ  मारुती कांबळे, हे कॉ  विष्णु सानप, एन पी सी  गोविंद भताने, पो कॉ  सचिन आंधळे, चालक पोहे कॉ अतुल हराळे यांचे पथक 08/07/2025 रोजी रात्री साडे सात वाजण्याच्या दरम्यान बर्दापूर पोलीस स्टेशन हद्दीतील निरपना तालुका अंबाजोगाई येथे  पेट्रोलिंग करत असताना या पाठकाने चोरून वाळूची वाहतूक करणारी एक हायवा गाडी पकडून शंकर लक्ष्मण केंद्रे वय 30 व फरार आरोपी संतोष बाबुराव केंद्रे (गाडी चालक व मालक) या दोघांवर बर्दापूर पोलिस ठाणे येथे गु र न 171/2025 कलम 303(2), 3(5) बनसोडे अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आसुन त्यांच्या कडून हायवा व वाळू असा एकूण  21 लाख 25 हजार रुपयाचा मुद्देमाल  जप्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!