पोलिस उपनिरीक्षक आण्णा गुंजाळ यांची लोणावळ्यात टायगर पॉईंट येथील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या
पोलिस उपनिरीक्षक आण्णा गुंजाळ यांची लोणावळ्यात टायगर पॉईंट येथील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या
पुणे (प्रतिनिधी)
पुण्यातील खडकी पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या आण्णा गुंजाळ नामक पोलीस उपनिरीक्षकाने लोणावळ्यात जाऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आसून मागील ३ दिवसांपासून गुंजाळ हे ड्युटीवर नव्हते.
लोणावळ्यातील टायगर पॉईंट लगत त्यांनी झाडाला गळफास घेतल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. या घटनेच्या ठिकाणी गुंजाळ यांची गाडीही आढळून आली आहे. या गाडीत एक डायरी आहे. कदाचित या डायरीमध्ये त्यांच्या आत्महत्येमागचे कारण दडलेले असू शकते. लोणावळा ग्रामीण पोलीस घटनास्थळी पोहचलेले असून खडकी पोलीस ही घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत. पोलिसांकडून त्यांचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून याठिकाणी गुंजाळ यांची असलेली गाडीही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. आता या कारमधील डायरीत त्यांनी मृत्यूपूर्वी काही लिहून ठेवले आहे का? याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
अण्णा गुंजाळ हे गेले दोन वर्षांपासून खडकी पोलीस ठाण्यातील तपास पथकात कार्यरत होते. ते मुळचे अहिल्यानगर मधील संगमनेर येथील आहेत. ते ३ फेब्रुवारीपासून रजेवर होते. त्याबाबत त्यांनी काही कळविले नसल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे यांनी सांगितले.