ध्येय निश्चित करा, यश मिळतेच- ॲड. अविनाश धायगुडे
ध्येय निश्चित करा, यश मिळतेच- ॲड. अविनाश धायगुडे
विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कारचे वितरण
अंबाजोगाई -: जोपर्यंत स्वतःचे ध्येय निश्चित करणार नाहीत तो पर्यंत पुढे जाता येणार नाही.यासाठी ध्येय निश्चित करा,यश मिळतेच.असे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते ॲड. अविनाश धायगुडे यांनी केले.
येथील जय भारती सेवाभावी प्रतिष्ठान व जाधव कोचिंग क्लासेस, अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी आद्यकवी मुकुंदराज सभगरहात आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व
विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कारचे वितरण या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून ॲड. अविनाश धायगुडे बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा होते.तर मंचावर दाजीसाहेब लोमटे, रामकृष्ण पवार गुरुजी,जयभरती संस्थेचे अध्यक्ष ॲड.माधव जाधव,जाधव कोचिंग क्लासेसच्या संचालिका सौ.ज्योती जाधव यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना ॲड. अविनाश धायगुडे म्हणाले की
विद्यार्थ्यांनी न्यूनगंड न बाळगता ज्या क्षेत्रात आवड आहे.त्या विषयाला प्राधान्य द्यावे.
आपले स्वप्न आपणच ठरवा व ते पूर्ण करा.मात्र यासाठी
आयुष्यात प्लॅनिंग महत्वाचे आहे. मर्यादित राहू नका,तर आपल्या कक्षा उंचवा.असे आवाहन त्यांनी केले.
आपल्या अध्यक्षीय समारोप करताना नंदकिशोर मुंदडा म्हणाले की विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळाली की त्यांचा प्रवास योग्य दिशेने होतो. मात्र पालकांनी आपल्या अपेक्षा मुलांवर लादु नयेत.तर त्यांच्या आवडीच्या विषयावर त्यांना करीयर करण्याची संधी द्यावी. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कारचे वितरण शाल, श्रीफळ व सन्मानपत्र, देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड माधव जाधव यांनी केले. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास प्रारंभ झाला.
—
*यांचा झाला पुरस्काराने सन्मान -:*
विधीसेवा गौरव पुरस्कार.स्व. अॅड. अण्णासाहेब लोमटे स्मृति प्रित्यर्थ मा. अॅड. महाजर अली उस्मानी,
समाजसेवा गौरव पुरस्कार स्व. द्वारकादासजी लोहिया स्मृति प्रित्यर्थ अॅड. संतोष पवार,
आरोग्यसेवा गौरव पुरस्कार
स्व. डॉ. व्यंकटराव डावळे स्मृति प्रित्यर्थ मा. डॉ. राकेश जाधव,
पत्रकारिता गौरव पुरस्कार स्व. साधु गुरुजी स्मृति प्रित्यर्थ पत्रकार प्रशांत बर्दापूरकर,
शिक्षणसेवा गौरव पुरस्कार स्व. एकनाथराव खेडगीकर उर्फ बेथुजी गुरुजी स्मृति प्रित्यर्थ दि.ना. फड यांना शाल, श्रीफळ,सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
—
