ताज्या घडामोडी

अतिक्रमणे काढताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी अतिरेक केला- ऍड इस्माईल गवळी व कॉ बब्रुवान पोटभरे यांचा आरोप

अतिक्रमणे काढताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी अतिरेक केला- ऍड इस्माईल गवळी व कॉ बब्रुवान पोटभरे यांचा आरोप

oppo_2

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने अंबाजोगाई शहरातील अतिक्रमण धारकावर दोन दिवस बुलडोजर चालवण्यात आल्याने दोन दोन मजली धारकांना इमारतीचे नुकसान सोसावे लागले दरम्यान ही अतिक्रमणे काढताना पथकाने पक्षपाती भुमीका केल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत असून या वेळी ज्यांच्या घराच्या रजिस्ट्री आहेत त्यांनाही कुठलीही नुकसान भरपाई न देता त्यांची घरे पाडल्याचा त्यांचा आरोप आहे. या संदर्भात ऍड इस्माईल गवळी व कॉ बब्रुवान पोटभरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन प्रशासनावर ताशेरे ओढले.

     केज मतदार संघाच्या आमदार सौ नमिताताई मुंदडा यांच्या प्रयत्ना मधून अंबाजोगाई शहरातील रस्त्या साठी कोटयावधी रुपयांचा फंड उपलब्ध झाल्या मुळे शहरातील रस्ते चकाचक झाले आहेत, होत आहेत मात्र शहरातील अतिक्रमणाची समस्या काही सुटता सुटायला तयार नाही. अंबाजोगाई शहरातील नगर परिषद व सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत येणारा एकही रस्ता असा नाही की ज्या रस्त्यावर अतिक्रमण नाही, नगर परिषद हद्दी प्रमाणेच संत भगवान बाबा चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक व पुढे सदर बाजार, दवाखाना, मोरेवाडी मार्गे यशवंतराव चव्हाण चौक, लातूर टी पॉईंट व छत्रपती शिवाजी महाराज चौक ते रमाबाई चौक ते यशवंतराव चव्हाण चौक या प्रमुख रस्त्यावर नव्याने बांधलेल्या नाल्यावरील अतिक्रमणा सह रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर आतिक्रमणे झाली असून छत्रपती शिवाजी महाराज चौक ते स्वा रा ती रुग्णालय मार्गे यशवंतराव चव्हाण चौक या रस्त्यावरील रस्त्याच्या मध्या पासून दोन्ही बाजूची 50 फुटाच्या आतील सर्व अतिक्रमणे दोन दिवसा पूर्वी काढून घेण्यात आली.

    या वेळी अतिक्रमण धारकावर दोन दिवस बुलडोजर चालवण्यात आल्याने दोन दोन मजली धारकांना इमारतीचे नुकसान सोसावे लागले दरम्यान ही अतिक्रमणे काढताना पथकाने पक्षपाती भुमीका केल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत असून या रस्त्यावर अनेक गोरगरीब नागरिकांच्या घराच्या रजिस्ट्री आहेत त्यांनाही झोपेत धोंडा घातल्या प्रमाणे कुठलीही नुकसान भरपाई न देता त्यांची घरे पाडण्यात आली त्यामुळे त्यांना उघड्यावर यावे लागले आसून आशा सर्व रजिस्ट्री धारकांना नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.

सार्वजनिक बांधकाम विभागाचा अतिरेक -ऍड इस्माईल गवळी

   या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ऍड इस्माईल गवळी
म्हणाले की, अतिक्रमणे काढताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी अतिरेक केला असून अतिक्रमण धारकांना जागेवर नोटीस देण्यात आल्या. बस स्टॅन्ड पासून स्वा रा ती रुग्णालया कडे येणारा रोड पूर्वी न प कडे होता त्या नंतर सा बा कडे गेला
न प कडे असताना किती होता आणि आता किती हे स्पष्ट केलेले नाही, सा बा कडे याचे रेकॉर्ड आहे.
    छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील कोर्ट इमारत 22 ला बांधली या वेळी संरक्षण भिंती बांधली गेली आज 2 वर्षात ती पाडली गेली. या रस्त्यावर
नोंदणीकृत घरे, रजिस्ट्री, सात बारा आहेत या पूर्वी मध्यभागातून 40 फुटावर नाल्या बांधण्यात आल्या होत्या आज रस्ता 50 फूट होत असेल तर या नाल्या कशा साठी बांधल्या गेल्या. मालकीच्या जागेचे अधिग्रहण कलेले नाही. विकासाच्या नावाखाली संसार उद्धवस्त करण्याचे काम केले गेले.
या लोकांची मालकी असताना त्यांची  चूक काय होती की त्यांनी घरे पाडली.
सर्व अतिक्रमण धारकांना न्याय न मिळाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन व जनहित याचिका दाखल करण्यात येईल असेही ते म्हणाले.
      या वेळी त्यानी भाजी मंडी प्रमाणे तहसील समोर नगर परिषदेने पत्री गाळे बनवून द्यावेत अशी मागणी केली.
     या वेळी बोलताना कॉ बब्रुवान पोटभरे म्हणाले की 400 वर्षा पूर्वी ची या ठिकाणी मालकीची घरे होती मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी मनमानी करून अतिक्रमणे काढली हा सत्तेने उगवलेला सूड असून गरिबांना उध्वस्त करण्याचा विकास त्यांनी केला आहे. शासनाने या सर्व नागरिकांना पर्यायी जागा द्यावी. जनतेची तयारी असेल तर आम्ही रस्त्याचे काम बंद करू असा इशारा या वेळी त्यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!