ताज्या घडामोडी

वाल्मिक कराड यांना पुणे येथून अटक करण्यात आल्याचे वृत्त खोटे, आज  आत्मसमर्पण करण्याची शक्यता ? 

वाल्मिक कराड यांना पुणे येथून अटक करण्यात आल्याचे वृत्त खोटे, आज  आत्मसमर्पण करण्याची शक्यता ? 

बीड (प्रतिनिधी)

    मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खूनप्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप होत असलेला वाल्मिक कराड यांना पुणे येथून अटक करण्यात आल्याचे वृत्त खोटे असून आज ते आत्मसमर्पण करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  मुख्यमंत्री मा ना देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने वाल्मिक कराड याच्यासह फरार आरोपींची संपत्ती देखील जप्त करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आसून वाल्मिक कराड याच्या नातेवाईकांची देखील बँक खाती गोठवण्यात आली आहेत. वाल्मिक कराड याचेही बँक खाते गोठवण्यात आले आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले, विष्णू चाटे या चौघांना पोलिसांनी आधीच अटक करण्यात आली असून सुदर्शन घुले कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे हे तीन आरोपी अद्याप ही फरार आहेत. तसेच या प्रकरणात मास्टरमाईंड म्हणून विरोधकांसह सत्ताधारी आमदारांनी देखील वाल्मिक कराडवर या हत्या प्रकरणात संशय व्यक्त केला आहे. असं असलं तरी पोलिसांनी वाल्मिक कराडवर फक्त खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल केला आसून काल घटनेच्या वेळी वापलरलेल्या गाडी मधून जे 2 मोबाईल मिळाले त्यातून जी माहिती मिळाली या वरून वाल्मिक कराड यांच्या निकटवर्तीयांची कसून चौकशी करण्यात येत आहे आणि कराड यांच्या शोधासाठी सी आय डी चे 200 पोलीस रवाना झाले आहेत.

काल रात्री वाल्मिक कराड यांना पकडल्याची बातमी काही प्रसार माध्यमांनी दिली होती मात्र ती खोटी ठरली असून एकूणच निर्माण झालेल्या परस्थितीवर आता सुटका होणे शक्य नसल्याने वाल्मिक कराड हे आज स्वतःहून आत्मसमर्पण करतील असा अंदाज वर्तवल्या जात आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!