ताज्या घडामोडी

अहो आश्चर्य वाटू देऊ नका बरका पुण्यात चक्क लाच देणाऱ्यालाच केली अटक

अहो आश्चर्य वाटू देऊ नका बरका पुण्यात चक्क लाच देणाऱ्यालाच केली अटक

   पुणे (प्रतिनिधी)

   पुण्या मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेणाऱ्याला नाही तर देणाऱ्यालाच अटक केली असून कधी नव्हे ते दाखल झालेल्या या आगळ्या वेगवेगळ्या गुन्ह्याची चवीने चर्चा होताना दिसत आहे.

    लाच देणं आणि घेणं हा गुन्हा आहे, हा नियम प्रत्येकालाच माहिती आहे. सर्व कार्यालयात या संदर्भात सूचना ही लावलेली असते. त्यानंतरही एखादं काम करण्यासाठी लाच देण्याचे प्रकार घडत असतात मात्र पुण्यात घडलेल्या या दुर्मीळ प्रकारा विषयी प्राप्त माहिती आशी की, हसन अली गुलाब बारटक्के (वय 45) असं या प्रकरणातल्या आरोपीचं नाव आसून त्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) एका स्थावर मालमत्ता एजंटला एका फौजदारी खटल्याचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला लाच देण्याचा प्रयत्न करताना अटक केली.तो 2,000 रुपयांची लाच देताना एसीबीने लावलेल्या सापळ्यात पकडला गेला. बारटक्के आपल्याला वारंवार लाच देण्याचा प्रयत्न करत आहे, अशी माहिती बंडगार्डन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम यांनी एसीबीला कळवले होते. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. तपास हाताळणारे एपीआय कदम यांनी लाच घेण्यास नकार देत एसीबीकडे तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर एसीबीने स्टिंग ऑपरेशनची योजना आखली आणि अंमलात आणली. ताडीवाला रोड पोलीस चौकीत बारटक्के यांनी एपीआय कदम यांच्याकडे 2,000 रुपये सुपूर्द केले, त्यावेळी त्यांना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ.शीतल जानवे यांनी या कारवाईचे निरीक्षण केले. बारटक्के यांच्यावर सार्वजनिक सेवकाला लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता, अलिकडच्या वर्षांत एखाद्या नागरिकाला अशा कृत्यासाठी अटक करण्यात आलेली एक दुर्मीळ घटना आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!