बीड जिल्ह्याचे नवीन पोलीस प्रमुख म्हणून नवनीत कॉवत यांची नियुक्ती
बीड जिल्ह्याचे नवीन पोलीस प्रमुख म्हणून नवनीत कॉवत यांची नियुक्ती
बीड जिल्ह्याचे नवीन पोलीस प्रमुख म्हणून नवनीत कॉवत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नवीन कॉवत हे सध्या छत्रपती संभाजीनगर येथे उपायुक्त असुन त्यांची (beed sp) एसपी म्हणून ही पहिलीच नियुक्ती आहे. ते 2017 च्या बॅचचे आयपीएस आहेत. अविनाश बारगळ यांच्या बदलीची घोषणा काल सभागृहात करण्यात आली होती. त्यानंतर बीडला पोलीस अधिक्षक म्हणून कोण येणार याची सर्वांना उत्सुकता होती. या पदासाठी अनेक नावांची चर्चा असतानाच आता शासनाने नवनीत कावत यांची या पदावर नियुक्ती केली आहे. कावत मुळचे राजस्थानचे असुन 2017 च्या बॅचचे आयपीएस आहेत. त्यांनी यापुर्वी धाराशिव येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून काम केले आहे तर सध्या ते छत्रपती संभाजीनगर येथे पोलीस उपायुक्त होते. एक शांत पण ठाम अधिकारी अशी त्यांची ओळख आहे.
