एमकेसीएलच्या वतीने अंबाजोगाईच्या कंम्पूटर वर्ल्ड चा पुरस्काराने गौरव
एमकेसीएलच्या वतीने अंबाजोगाईच्या कंम्पूटर वर्ल्ड चा पुरस्काराने गौरव
अंबाजोगाई -: महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (एमकेसीएल) च्या वतीने घेण्यात आलेल्या सुंदर व स्वच्छ केंद्र स्पर्धा २०२४” या स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न झालेल्या वार्षिक सभेत अंबाजोगाई येथील प्रा. संतोष मोहिते यांच्या कॅम्पुटर वर्ल्ड ला जिल्ह्यातून द्वितीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
एमकेसीएलच्या व्यवस्थापकीय संचालिका वीणा कामथ यांचे हस्ते कंम्पूटर वर्ल्ड चे संचालक संतोष मोहिते यांना पुरस्कार देवून गौरविण्यात आले. गेल्या २० वर्ष्या पासून अंबाजोगाई व परिसरातील हजारो विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगारक्षम घडविण्याचे काम सातत्याने कंम्पूटर वर्ल्डच्या माध्यमातून केले जाते. या मुळे दरवर्षी एमकेसीएल कडून सातत्याने विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते. यावेळी महामंडळाचे अमित रानडे, अतुल पतौडी, दीपक पाटेकर विभागीय समन्वयक बालकिशन बलदवा, गजानन कुलथे लोकल लीड सेंटरचे गजानन पांचाळ हे उपस्थित होते.या मिळालेल्या पुरस्काराबद्दल प्रा. संतोष मोहिते यांचे सर्वत्र स्वागत होत आहे.
