*न्यू व्हिजन पब्लिक स्कूल मध्ये आयोजित शालेय क्रीडा स्पर्धेची विविध स्पर्धानी सांगता*
न्यू व्हिजन पब्लिक स्कूल मध्ये आयोजित शालेय क्रीडा स्पर्धेची विविध स्पर्धानी सांगता
अंबाजोगाई (प्रतिनिधी):- श्री बालाजी शिक्षक प्रसारक मंडळ अंतर्गत न्यू व्हिजन पब्लिक स्कूल मध्ये बाराव्या शालेय क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. या क्रीडा स्पर्धेत विविध प्रकारच्या स्पर्धा संपन्न झाल्या . या स्पर्धेत अनेक उदयोन्मुख यशस्वी क्रीडा स्पर्धक समोर आले आहेत. दोन दिवसीय शालेय क्रीडा स्पर्धांची सांगता शनिवार रोजी करण्यात आली . आज शाळेच्या मैदानावर सकाळपासून विविध क्रीडा स्पर्धा चारही हाऊसमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाल्या. स्पर्धेदरम्यान स्पर्धेतील एकूण स्पर्धकामध्ये अत्यंत उत्साह पहायला मिळाला . या चार हाऊसपैकी ग्रीन हाऊस उपविजेता ठरला तर येलो हाऊस विजेता ठरला. तसेच एकूण शालेय क्रीडा स्पर्धेचा चॅम्पियन इयत्ता दहावीचा विद्यार्थी सय्यद हुजैफा हा ठरला . सर्व विजेत्या स्पर्धकांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरीत करण्यात आले.
स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात व्यासपीठावरून बोलताना प्रमूख पाहुणे , खेळाडू रजत भोसले यांनी विद्यार्थ्यांनी दररोज एक तास तरी स्वतःच्या शरीरासाठी देण्याचे आवाहन केले . त्याचबरोबर कोणताही मैदानी खेळ खेळावा , त्यामुळे मन खंबीर होण्यास मदत होते.
या शालेय क्रीडा स्पर्धांच्या निरोप समारंभात प्रमुख पाहुण्या श्रीमती वर्षा दिख्खत ( जिल्हा सहसचिव खो-खो ) यांनी अगदी मोजक्या शब्दात मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांनी खेळांना महत्व द्यावे अशा सूचना केल्या. मोदी लर्निंग सेंटर येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी वेळोवेळी अनेक क्रीडा उपक्रम त्याचबरोबर सामाजिक , शैक्षणिक उपक्रम राबविले जात आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आयुष्यात नवनवीन ऊर्जा स्तोत्र निर्माण झाल्याचे पहावयास मिळत आहे. आजपर्यंत या संस्थेच्या माध्यमातून अनेक क्रीडापटू, साहित्यिक, डॉक्टर, इंजिनिअर, वैज्ञानिक तयार झाले आहेत.
संपन्न झालेल्या शालेय क्रीडा स्पर्धेच्या सर्व यशस्वी स्पर्धांकांचे संस्थेचे संस्थापक राजकिशोर मोदी, कार्यकारी संचालक संकेत मोदी , मार्गदर्शक वसंत चव्हाण, डी.एच. थोरात , बी. आय. खडकभावी , प्रा सुरेश बिराजदार , शिक्षक पालक समितीच्या सदस्या श्रीमती डॉ. अर्चना थोरात , शाळेचे प्राचार्य रेंजू आर चंद्रन यांच्यासह प्राचार्य विनायक मुंजे व सर्व क्रीडा शिक्षक – सहशिक्षक यांनी विजेत्या स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
