*विरोधका कडुन सौ नमिता अक्षय मुंदडा यांच्या विषयी गरळ ओकण्याचे काम सुरू, विरोधकांच्या भूल थापाना मतदार बळी पडणार नाहीत* *माजी उपनगराध्यक्ष सारंग पुजारी यांचा आत्मविश्वास*
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
मागील 35 वर्षा पासून केज मतदार संघात सर्वांच्या सुखदुःखात जाऊन ग्राउंड लेव्हलला काम कोण करत असेल तर ते नांव येते नंदकिशोर मुंदडा उर्फ काकाजी यांच आणि विरोधका कडुन त्यांच्याच नावाला बदनाम करत भाजप महा युतीच्या उमेदवार सौ नमिता अक्षय मुंदडा यांच्या विषयी गरळ ओकण्याचे काम सुरू आहे मात्र विरोधकांच्या भूल थापाना मतदार बळी पडणार नाहीत असा आत्मविश्वास माजी उपनगराध्यक्ष सारंग पुजारी यांनी व्यक्त केला आहे.
झुंजार न्यूज शी बोलताना सारंग पुजारी म्हणाले की, सन 1990 साली केज विधानसभा मतदार संघात अरुणोदय झाला तो स्व. विमलताई मुंदडा यांच्या राजकीय कारकिर्दीचा आणि त्यांच्या पाठीशी ताकत निर्माण झाली ती त्यांचे पती नंदकिशोर मुंदडा उर्फ काकाजी यांची.
त्या वेळ पासून आज तागायत केज विधानसभा मतदार संघात सर्वांच्या सुख दुःखात सहभागी होण्यासाठी दिवस रात्र धाव घेऊन काम करणारी व्यक्ती म्हणून काकाजी यांचं नाव समोर येते. आज ही काकाजीच वय 70 च्या घरात असलं तरी ते दिवस रात्र ऊन वारा पाऊस असला तरी दिवस भरात कमीत कमी 400 किलोमीटर प्रवास करून कोणाचे लग्न असेल, कोणाचा सखरपुडा असेल, कोणाची वास्तू शांती असेल, कोणी मयत झालं असेल, कोणाच दवाखाण्याचं काम असेल अशा वेळी आपली उपस्थिती देऊन सर्वासाठी मदतीला धाव घेत असतात.
ग्राउंड लेव्हलला काम असल्याने काकाजीला मतदार संघातील प्रत्येक गावची व त्या ठिकाणी स्थानिक नेतृत्व करणाऱ्या मंडळीची नस ना नस माहीत असल्याने स्व. विमलताई मुंदडा यांच्या हयाती मधील प्रत्येक निवडणुका आणि त्यांच्या पश्चात त्यांच्या सूनबाई सौ नमिता अक्षय मुंदडा यांच्या निवडणूकी मध्ये त्यांची रिंग मास्टर ची भूमिका राहिलेली आहे. याही निवडणुकीत सौ नमिता मुंदडा यांच्या विजया साठी काकाजी व्युव्हरचना आखत आहेत.
एकूणच मतदार संघातील जनता काकाजी यांच्या कार्यपद्धती वर समाधानी असताना विरोधक मात्र
त्यांच्याच नावाला बदनाम करत भाजप महा युतीच्या उमेदवार सौ नमिता अक्षय मुंदडा यांच्या विषयी गरळ ओकण्याचे काम करत आहेत. नमिता मुंदडा यांना शह देण्यासाठी मतदार संघातील सर्व विरोधक एक झाले आहेत. मुंदडा यांच्यावर घराणे शाही, मक्तेदारी, दडपशाही या सारखे आरोप विरोधका कडुन करण्यात येत आहेत. काकाजी कोणालाही जोरजोराने बोलतात, अंगावर धावून जातात असे आरोप करत आहेत. एवढेच नाही तर केज मतदार संघात आ नमिता मुंदडा, अक्षय मुंदडा व नंदकिशोर मुंदडा हे तीन तीन आमदार आहेत, ज्यांना निवडून दिले आणि पुन्हा ज्या उमेदवार म्हणून उभा आहेत त्या नमिता मुंदडा या रबरी शिक्का आहेत असा आरोप विरोधक करत आहेत.
सौ नमिता मुंदडा व अक्षय मुंदडा यांची कामाची पद्धत आणि काकाजी यांची व्युव्हरचना या मुळे भाजप पेक्षाही त्यांना वयक्तिक रित्या मानणारा वर्ग हा मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे मतदार विरोधकांच्या भूल थापाला बळी न पडता नमिता मुंदडा यांना प्रचंड मतांनी विजयी करतील असा आत्मविश्वास सारंग पुजारी यांनी व्यक्त केला आहे.
