*पृथ्वीराज साठे यांना आज नोट आणि 20 नोव्हेंबरला व्होट देण्यासाठी कार्यकर्ते सरसावल्याने साठे यांचा विजय निश्चित–* अमर भेय्या देशमुख यांचा विश्वास
*विनोद चाटे पाटील यांच्याकडून पृथ्वीराज साठे यांना १ लाख ११ हजार १११ रुपयाची मदत*
*पृथ्वीराज साठे यांना आज नोट आणि 20 नोव्हेंबरला व्होट देण्यासाठी कार्यकर्ते सरसावल्याने साठे यांचा विजय निश्चित–*
अमर भेय्या देशमुख यांचा विश्वास
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
केज येथे झालेल्या जाहीर सभेत तांबवा येथील विनोद चाटे पाटील यांच्याकडून पृथ्वीराज साठे यांना मदत म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते १ लाख ११ हजार १११ रुपयाची मदत दिल्या नंतर मतदार संघातील अनेक गावातून साठे यांना आज नोट आणि 20 नोव्हेंबरला व्होट देण्यासाठी कार्यकर्ते सरसावले असल्याने साठे यांचा विजय निश्चित असल्याचे मत रा कॉ श प गटाचे तालुकाध्यक्ष अमर भेय्या देशमुख यांनी व्यक्त केले आहे.
आमच्या प्रतिनिधींशी बोलताना अमर देशमुख म्हणाले की, लोकसभे प्रमाणेच विधान सभेची ही निवडणूक केज मतदार संघातील जनतेने हाता मध्ये घेतली असुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार माजी आ. पृथ्वीराज साठे हे स्वभावाने अतिशय शांत, गरीब, सदैव रस्त्यावर चालणारा साधा भोळा कार्यकर्ता म्हणून सर्व मतदार संघाला परिचित असून 2019 च्या निवडणुकी मध्ये पराभव होऊन ही त्यांनी मतदार संघाशी असलेली नाळ ही तुटू दिलेली नाही. मागील 5 वर्षात त्यांनी मतदार संघातील जनतेच्या सुख दुःखात धाव घेतल्याने जनतेच्या मनातील आमदार ही त्यांची प्रतिमा निर्माण झालेली आहे.
पृथ्वीराज साठे हे आर्थिक दृष्ट्या कमकुवत उमेदवार असले तरी त्यांच्या साठी माजी आ संगीता ठोंबरे, राजकिशोर पापा मोदी, अंजली घाडगे, बबन भेय्या लोमटे, हारून भाई इनामदार, सिताताई बन्सोड, दिलीप काळे या दिगग्ज नेत्या सह सामान्य कार्यकर्ता, मतदार मदतीला धावत असल्याचे सर्वत्र चित्र दिसून येत आहे.
पृथ्वीराज साठे यांची आर्थिक परिस्थिती व त्यांचा शांत स्वभाव पाहून अनेक गावातील कार्यकर्ते त्यांच्या कडून कुठल्याही गाड्या घोड्यांची किंवा आर्थिक लाभाची अपेक्षा करत नसून काल केज येथे झालेल्या जाहीर सभेत तांबवा येथील विनोद चाटे पाटील यांच्याकडून पृथ्वीराज साठे यांना प्रचारासाठी आर्थिक मदत म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते १ लाख ११ हजार १११ रुपयाची मदत दिली असून मतदार संघातील अनेक गावातून साठे यांना आज नोट आणि 20 नोव्हेंबरला व्होट देण्यासाठी कार्यकर्ते पुढे सरसावलेले दिसत आहेत. एकूणच मतदार संघात साठे यांच्या विषयी असलेल्या सहानभूतीच्या लाटेमुळे साठे यांचा विजय निश्चित असल्याचे मत अमर भेय्या देशमुख यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
