कविता म्हणजे अस्तित्वाचे गाणे या जगास पाहण्यास दृष्टी देणे या कविता तुमच्या आमच्या जगण्याचे लेणे आहे.
कविता म्हणजे अस्तित्वाचे गाणे या जगास पाहण्यास दृष्टी देणे या कविता तुमच्या आमच्या जगण्याचे लेणे आहे.
यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहातील कवि संमेलनास रसिकांचा प्रचंड प्रतिसाद-
अंबाजोगाई (वार्ताहर)-
कै. यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाच्या उद्घाटन सोहळ्या नंतर कवितेचा जागर झाला. गुलाबी थंडीत रसिकांच्या प्रचंड प्रतिसादाने रंगलेल्या या कवि संमेलनात शेतकऱ्यांची वेदना, दु:ख, राजकीय विडंबन, समाजाचे वास्तव चित्र शब्दातून बांधणाऱ्या कवितांनी या 40 व्या स्मृती समारोहातील कवि संमेलनातील सादर झालेल्या कविताला व कविता रसिकांनी डोक्यावरच घेतले. यंदाच्या कवि संमेलानाच्या अध्यक्षस्थानी ठाणे येथील जेष्ठ कवियत्री डॉ. प्रज्ञा दया पवार हे होते. या कवि संमेलनात वसईच्या प्रा. सिसिलिया कार्व्हालो, पुण्याचे संगिता बर्वे, छत्रपती संभाजीनगरचे नारायण पूरी, सांगलीचे रमजान मुल्ला, वर्धा (अंबाजोगाईचे) बालाजी सुतार, उमरगाचे बालाजी मदन इंगळे, बेळगांवची कवियत्री पूजा भडांगे, यवतमाळचे जयंत चावरे, नाशिकचे संजय चौधरी, शेगावचे नितीन वरणकर, अकोलाचे गोपाळ मापरी व परळीचे संजय आघाव या कविचा सहभाग होता. या कवि संमेलनाचे बहारदार सुत्रसंचालन अकोल्याचे कवि गोपाळ मापरी यांनी केले. काळजाचा डाव घेणाऱ्या कविचे, राजकीय व्यंग कविता सादर करण्यात आल्या.
कवि संमेलनाचा प्रारंभ कवि संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. प्रज्ञा पवार यांच्या “जिंदगी जानलेना” ही कविता खाणीत काम करणाऱ्या कामगाराच्या जीवन प्रसंग किती धोकादायक असते याची जाणीव करून देणारी भावपूर्ण कविता सादर केली. त्यानंतर उमरगा येथील कवि बालाजी इंगळे यांनी मी तुझी आठवण काढील व तमाम कविनो चला कामास लागू या ही कविता सादर केली. पुणे येथील सुमिती लिमये यांनी स्त्रीवादी कविता सादर करून स्त्रीयामध्ये जागृती आणण्याचा प्रयत्न केला. कवितेत म्हणतात लोक पोहरात आली चैत्र येथे साजरे सणवार केले. मोगऱ्याने मोठे उपकार केले. यवतमाळचे जयंत चावरे यांनी वऱ्हाडी भाषेत “मायमाऊली” या कवितेत आईचे नीरगस किती महत्त्व पूर्ण स्थान असते याचे दर्शन कवितेतुन मांडुन रसिकांची मन जिंकली. त्याचबरोबर दुसरी कविता “आजी” या कवितेते आजी व नातू यांचे भावपूर्ण संबंधाचे वर्णन करताना कवि म्हणतात.
आजी म्हणते,
तुझ्या विना मुक घर व सुन्न झाले आंगण
वाढवू नको तुझ्या माझ्यात दरी
तुझ्या आठवणी जपून ठेवल्या बाळा
येना धावत बाळा आजीकडे
तुझी भेट माझ्यासाठी पंढरीची वारी
अशा भावना प्रबाध कवितेला रसिकांनी डोक्यावर घेतले. बेळगावच्या पूजा भडंगे, सांगलीचे रमजान मुल्ला, वर्धा अंबाजोगाईचे कवि बालाजी सुतार, शेगावचे नितीन वरणकर, परळी-वैजनाथचे संजय आघाव, पुण्याचे संगिता बर्वे, वसईच्या प्रा. सिसिलिया कार्व्हालो, अकोलाचे गोपाळ मापरी या कविंनी शेतकऱ्यांच्या जीवनाचे वास्तव दर्शन करून देणाऱ्या ऱ्हदयस्पर्शी कविता सादर केल्या. सध्या राजकीय परिस्थिती व राजकीय पक्षाचे विडंबन करणाऱ्या कवितेलाही प्रेक्षकांकडुन प्रतिसाद मिळाला. अशा बहारदार कविसंमेलनाचे प्रास्ताविक समारोह समितीचे सदस्य प्रा. भगवान शिंदे यांनी केले. सर्व कविचे स्वागत सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देवून समितीचे सचिव दगडू लोमटे यांनी केले. कवि संमेलनास रसिक प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केली होती. गुलाबी थंडीत हे रंगलेले कवि संमेलन ठरले.
