अंबाजोगाई शहरात मोबाईल हिसकाऊन चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने केला पर्दाफाश
अंबाजोगाई शहरात मोबाईल हिसकाऊन चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने केला पर्दाफाश

अंबाजोगाई – (प्रतिनिधी)
अंबाजोगाई शहरात मोटार सायकल वर येवुन पाई जात असलेल्या व्यक्तीचे मोबाईल हिसकावुन नेवुन चोरी करणारी टोळी सक्रिय झाली होती दरम्यान दोन गुन्हयांची नोंद पो.स्टे. अंबाजोगाई शहर ठाण्यामध्ये नोंदविण्यात आली होती. सदर चोरीचे अनुषंगाने मा. पोलीस अधीक्षक बीड यांनी उघडकीस न आलेल्या गुन्हयाचा आढावा घेवुन उघडकीस न आलेले जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस निरीक्षक स्था.गु.शा. बीड यांना आदेशीत केले होते. त्यावरुन पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांनी अभिलेखावरील उघडकीस न आलेल्या गुन्हयांचे विश्लेषण करुन स्थागुशा बीड येथील पोउपनि सुतळे यांना याकामी पाचारण केले. पोउपनि सुतळे यांनी दिनांक 29/11/2021 गेली अंबाजोगाई शटर 28/11/2024 रोजी अंबाजोगाई शहर आरोपी शोध घेत असतांना गुप्त बातमी मिळाली की, निखील लक्ष्मण घाडगे रा. दौनापुर याचेकडे चोरीचा 10 प्लस मोबाईल असुन तो मुकुंदराज सभागृह समोर आहे अशी खात्रीशिर माहिती मिळाल्यावरुन स्था.गु.शा. पथकाने तात्काळ रवाना होवुन नमुद ठिकाणावरुन निखील लक्ष्मण घाडगे व त्याचे दोन मित्रांसह मिळुन आला.
निखील यास मोबाईल संदर्भात विचारपुस करता त्याने त्याचे इतर दोन मित्र (अल्पवयीन) यांचेकडुन घेतला असल्याने कळविले. दोन अल्पवयीन इसमांना मोबाईल बद्दल विचारपुस केली असता त्यांचेकडुन अंबाजोगाई शहर 258/2024 कलम 392,34 या गुन्हयातील गेलामाल मिळुन येवुन त्यांची संगनमताने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्यांचेजवळ एक आय फोन 16 प्रो कं. मोबाईल मिळुन आला असुन सदर मोबाईल त्यांनी पाई जाणाऱ्या पादचाऱ्याचा हिसकावुन चोरी केला होता
या प्रकरणी अंबाजोगाई शहर येथे गुरनं 461/2024 कलम 304(1) भा.न्या.सं. प्रमाणे गुन्हयाची नोंद मिळुन आली. त्यानंतर त्यांचे ताब्यात दोन विनानंबरच्या दोन होंडा शाईन मोटार सायकली मिळुन आल्या अभिलेख पाहता 1) पो.स्टे.यु.वडगाव गुरनं 173/2024 कलम 303(2) भा.न्या.सं. व पो.स्टे. परळी ग्रामीण गुरनं 230/2024 कलम 303 (2) भा.न्या.सं. प्रमाणे गुन्हयात चोरी असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपी निखील लक्ष्मण घाडगे वय 20 वर्षे रा. दौनापुर ता. परळी हा जबरी चोरीचे गुन्हयात निष्पन्न झाला व दोन विधीसंघर्षग्रस्त बालके त्याचे इतर एक मित्रासह जबरी चोरी व मोटार सायकल चोरी अशा चार गुन्हयात निष्पन्न झाल्याने त्यांचे कडुन चोरीचे दोन मोबाईल व दोन चोरीच्या मोटार सायकली व गुन्हा करण्यासाठी वापरलेले स्पेंडर मो.सा. असा एकुण 2,10,000/- रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कामगिरी अविनाश बारगळ पोलीस अधीक्षक बीड, मा. अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, पोलीस निरीक्षक उस्मान शेख, पो.नि.श्री. विनोद घोळवे अंबाजोगाई शहर यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि सुशांत सुतळे, पोउपनि हनुमान खेडकर, पोह/मारुती कांबळे, बाळकृष्ण जायभाये, राजु पठाण, अश्विनकुमार सुरवसे, चालक नितीन वडमारे यांनी मिळुन केली आहे.
