*विद्यार्थ्यांनी विजेत्यांची मानसिकता आत्मसात करावी – डॉ.राजेश इंगोले*
*विद्यार्थ्यांनी विजेत्यांची मानसिकता आत्मसात करावी – डॉ.राजेश इंगोले*
=======================
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
येथील प्रमोदजी महाजन न्यू इंग्लिश स्कूल येथे विद्यार्थ्यांसाठी वार्षिक क्रीडा स्पर्धांना सुरूवात झाली. अंबाजोगाईचे सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ तथा इंडीयन मेडिकल असोसिएशनचे सांस्कृतिक समितीचे अध्यक्ष डॉ.राजेश इंगोले यांच्या हस्ते या क्रीडा महोत्सवाचे अतिशय जोशपूर्ण वातावरणात उदघाटन करण्यात आले.
यावेळी संस्थेच्या प्राचार्या प्रा.गितांजली कुलकर्णी, प्रा.योगेश कुलकर्णी, सचिव शैलेश कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रा.गितांजली कुलकर्णी यांनी संस्थेच्या विविध क्रीडा स्पर्धा दरवर्षी होत असतात आणि या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी विविध क्रीडा प्रकारांमध्ये राज्यस्तरीय पातळीवर गेले आहेत. यापुढेही विद्यार्थ्यांना विविध क्रीडा स्पर्धांमध्ये संधी देत राहू अशी ग्वाही दिली. यावेळी बोलताना डॉ.राजेश इंगोले यांनी अभ्यासासोबतच क्रीडा नैपुण्य अत्यंत आवश्यक आहे. कारण, शारीरिक आणि मानसिक संतुलन राखण्याचे काम विविध क्रीडा प्रकार करीत असतात. ज्ञानासोबतच शारीरिक आणि मानसिक तंदुरूस्ती आवश्यक आहे हे स्पष्ट करीत प्रमोदजी महाजन न्यू इंग्लिश स्कुल अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांच्या क्रीडा आणि सांस्कृतिक कौशल्य विकासाबाबतीत सजग आहे. असे गौरवोद्गार त्यांनी काढले. केवळ जिंकण्यासाठीच नाही. तर जिंकलेल्या सर्वांसाठी आपण आनंद व्यक्त केला पाहिजे ही खिलाडूवृत्ती असली पाहिजे. जीवनामध्ये यश अपयश येत असते पण आहे. त्या परिस्थितीला स्वीकारून जिंकण्याची मानसिकता प्रत्येक विद्यार्थ्यानी आत्मसात केली पाहिजे अशी अपेक्षा डॉ.राजेश इंगोले यांनी व्यक्त केली. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारांमध्ये सहभाग नोंदवीत आपले क्रीडा नैपुण्य ही दाखवीले. पहिल्या दिवशी झालेल्या क्रीडा स्पर्धांचे बक्षिस वितरणही डॉ.राजेश इंगोले यांच्या हस्ते करण्यात आले. या क्रीडा महोत्सवाचे आभार प्रदर्शन प्रा.योगेश कुलकर्णी यांनी केले. तर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेच्या सर्व शिक्षक, कर्मचारीवृंद यांनी पुढाकार घेतला.
=======================
*नोट – बातमी सोबत फोटो.*
=======================
