*खा. सुप्रियाताई सुळे यांच्या भेटीतील सकारात्मक चर्चे वरून एन डी शिंदे यांना केज मतदार संघातुन रा कॉ शरदचंद्र पवार गटाची उमेदवारी मीळण्याच्या आशा पल्लवित*
पुणे (प्रतिनिधी):-
केज विधानसभा मतदारसंघातुन
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटा कडुन निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले सेवा निवृत्त कार्यकारी अभियंता इंजि एन डी शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खा. सुप्रियाताई सुळे यांची भेट घेतली असुन या भेटीतील सकारात्मक चर्चे वरून एन डी शिंदे यांना उमेदवारी मीळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
पुढील महिन्यात राज्यात होऊ घालेल्या विधानसभा निवडणूकी साठी सर्वच पक्ष तयारीला लागले आसून राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटा कडुन उमेदवारी मागणारांची
संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे.
पक्षातील आजी माजी तथा इच्छुक उमेदवार देखील निवडणूक लढविण्यासाठी मतदारांच्या व वरीष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेतांना दिसून येत आसून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटा कडुन बीड जिल्ह्यातील केज विधानसभे साठी उमेदवारी मिळावी या साठी माजी कार्यकारी अभियंता एन डी शिंदे (नवनाथ ज्ञानोबा शिंदे) हे मागील वर्ष भरा पासून प्रयत्नशील आहेत.
एन डी शिंदे हे अंबाजोगाई तालुक्यातील कुंबेफळ या गावचे रहिवासी असून ते उच्चविद्या विभूषित आहेत. त्यांनी ३६ वर्ष शासकीय सेवा केली असून आपल्या ३६ वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी २६ वर्ष बीड जिल्ह्यातच सेवा बजावली असल्याने त्यांचा बीड जिल्ह्यात आणि केज मतदार संघात दांडगा संपर्क निर्माण झाला आहे. त्यांना समाज सेवेचा ध्यास असल्याने आपल्या सेवाकाळात देखील त्यांनी सामाजिक सेवेचा वसा सोडला नाही राज्याचे माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या माध्यमातून त्यांनी आपली
समाजसेवा कार्यरत ठेवली आहे. राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे मराठवाडा उपाध्यक्ष म्हणून ते आजही कार्यरत असून त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनियर्स या संघटनेचे लातूर जिल्हाध्यक्ष म्हणून देखील अतिशय उत्तम पणे काम केलेले आहे.
राज्याच्या माजी मंत्री स्व विमालताई मुंदडा यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पोटनिवडणुकीत देखील एन डी शिंदे यांच्या पत्नीचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता मात्र निर्माण झालेल्या परिस्थिती नुसार त्यांना माघार घ्यावी लागली होती. सामाजिक कार्याचा ध्यास घेतलेले एन डी शिंदे यांनी मागील वर्ष भरात जवळपास 125 गावांना भेटी देत विविध पक्षांच्या कार्यर्त्यांच्या मतदारांच्या भेटीगाठी घेऊन आपला संपर्क आणखी वाढवला असून जागोजागी त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे. याच जनसंपर्काच्या शिदोरीवर राज्यात बदललेल्या राजकीय समिकरणा मधून केज विधानसभेसाठी उमेदवारी द्यावी या साठी इंजि एन डी शिंदे यांनी या पूर्वीच शरदचंद्र पवार साहेबांची भेट घेतली असून रा कॉ शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे उमेदवारी मागणी संदर्भात पत्र सादर केले आहे.
नुकत्याच पुणे येथे झालेल्या केज मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या इच्छुक 12 उमेदवारांच्या मुलाखती मध्ये एन डी शिंदे यांची मुलाखत ही प्रभावशाली झाली असून त्यांनी उमेदवारी मिळवण्या साठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खा. सुप्रियाताई सुळे यांची भेट घेतली असून या भेटीत झालेल्या सकारात्मक चर्चे वरून एन डी शिंदे यांना उमेदवारी मीळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
एन डी शिंदे यांना पक्षाने उमेदवारी दिल्यास ते पूर्ण ताकदीने निवडणूक मैदानात उतरून निवडणूक जिंकण्या साठी सर्वतोपरी प्रयत्नशील राहतील यात तिळमात्र ही शंका नाही.
