“विश्वविद्या” हा आयटी डोमेनमधील तरुण-तरुणींसाठी देशातील सर्वात मोठा प्लॅटफॉर्म – ॲड. शंकर चव्हाण यांचं प्रतिपादन
पुणे | प्रतिनिधी :
विश्वविद्या हा आयटी डोमेनमधील तरुणांसाठी देशातील सर्वात मोठा प्लॅटफॉर्म आहे असे प्रतिपादन ॲड. शंकर चव्हाण यांनी पुणे येथे विश्वविद्या या संस्थेच्या एका विशेष कार्यक्रमादरम्यान केले. ते पुढे म्हणाले की, प्रामुख्याने मोठया प्रमाणात रोजगारक्षमता वाढविण्याच्या उद्देशाने देशातील सर्वात मोठा हा प्लॅटफॉर्म आहे असं म्हटलं तर वावगं ठरु नये. कारण देशातलं मोठा आयटी हब असलेल्या पुणे महानगरात गेल्या कित्येक वर्षापासून अगदी निशुल्क असा कौतुकास्पद व सामाजिक हित जोपासत सुरु झालेला व तरुणांसाठी विशेष करुन आयटी क्षेत्रात करिअर करणाऱ्या नोकरी करु इच्छिनाऱ्या उमेदवारांसाठी हा उपक्रम होय. विश्वविद्या हा “ओम एज्युकेशन फाऊंडेशन ट्रस्ट चा एक उपक्रम आहे, सन २०१० मध्ये नोंदणीकृत ट्रस्ट म्हणून करण्यात आली होती. सदर संस्थेच्या स्थापनेपासून, ट्रस्टने प्रामुख्याने रोजगारक्षमता वाढविण्याच्या उद्देशाने उपक्रम राबविण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत व आजही अगदी सातत्य ठेवून पुढे वारसा सुरुच आहे. खरंतर या माध्यमातून, लाखो तरुणांच्या जीवनावर त्याचा सकारात्मक परिणाम झालेला दिसून येतो. खडतर प्रवासामधून जाणाऱ्या तरुणांना योग्य दिशा देण्याचं काम विश्वविद्या ही संस्था अगदी निशुल्क सेवा पुणे सारख्या आयटी हब असलेल्या शहरात प्रदान करत आहे हे खरंच खुप मोठं सामाजिक कार्य असल्याचंही ते प्रसंगी बोलत होते.
विश्वविद्या हा एक सामाजिक कार्यक्रम आहे जो बेरोजगारी आणि पूर्ण करिअरमधील अंतर कमी करण्यासाठी समर्पित आहे. विश्वविद्या अशा भविष्याची कल्पना करतो जिथे प्रत्येक बेरोजगार व्यक्तीला परिपूर्ण आणि शाश्वत रोजगार मिळविण्याची संधी आणि समर्थन असेल. मार्गदर्शक, व्यवसाय आणि व्यक्ती यांच्यातील सहकार्याद्वारे, विश्वविद्या ही संस्था एक भरभराट करणारे कर्मचारी आणि मजबूत समुदायासाठी कार्य करते. विश्वविद्या – करिअर मार्गदर्शनासोबत आयटी क्षेत्रात करिअर करणारांसाठी ही भविष्य उज्वल करण्यासाठी खुप मोठी संधी असल्यामुळे त्या संधीचं सोनं तरुण-तरुणींनी करावं असंही ॲड. शंकर चव्हाण प्रसंगी बोलत होते. आजच्या स्पर्धात्मक जगामध्ये शैक्षणिक गुणवत्तेबाबत जॉब मिळण्यासाठी डोमेन नॉलेज आवश्यक आहे आणि हे मिळण्यासाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध नाहीत .विश्वविद्या तरुण-तरुणींना विविध आयटी डोमेन मधील तज्ञ लोकांना एकत्र आणून त्यांचं ज्ञान आणि अनुभव मिळवून देण्यासाठी कृतिशील आहे.सर्वात महत्वाचे म्हणजे यांसाठी विश्वविद्या कुठल्याही प्रकारचं शुल्क आकारत नाहीत.
विश्वविद्या कसं काम करते ?
विश्वविद्या प्लॅटफॉर्मच्या केंद्रस्थानी योग्य मार्गदर्शन आहे जे तरुण-तरुणींना पुस्तक आणि ऑनलाईन कोर्सेस च्या पलीकडे जावून प्रत्यक्ष प्रोजेक्ट चा अनुभव देण्यामध्ये जास्त विश्वास ठेवते. विश्वविद्या प्लॅटफॉर्म नॉलेज आणि जॉब या मधील अंतर कमी करण्यामध्ये जास्त विश्वास ठेवते. आत्तापर्यंत शेकडो मुलांना या प्लॅटफॉर्म द्वारे जॉब मिळाला आहे. तर तरुण-तरुणींनी संधीची वाट पाहू नका तर ती निर्माण करा.आजच विश्वविद्यामध्ये सामील व्हा आणि योग्य मार्गदर्शनासह तुमच्या पूर्ण क्षमतेचा वापर करून जॉब योग्य व्हा. अधिक माहिती साठी info@vishvavidya.com वरती संपर्क करा किंवा+91 89560 28314 वर कॉल करा. तुमचं भविष्य आजच घडवा… www.Vishvavidya.com
