राजकारण

खासदार बजरंग सोनवणे यांनी पत्रकारा बद्दल केलेल्या बेताल वक्तव्याचा सर्वत्र निषेध, जाहीर माफी मागावी पत्रकारा मधून मागणी

खासदार बजरंग सोनवणे यांनी पत्रकारा बद्दल केलेल्या बेताल वक्तव्याचा सर्वत्र निषेध, जाहीर माफी मागावी पत्रकारा मधून मागणी

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
   बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी पत्रकारा बद्दल केलेल्या बेताल वक्तव्याचा सर्वत्र निषेध व्यक्त होत असून या वक्तव्या बद्दल जाहीर माफी मागावी अशी मागणी पत्रकारा मधून होत आहे.
    नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांची उमेदवारी साठी शिफारस करण्या पासून ती मिळवून देण्या पर्यंत  संशयास्पद भूमिका राहिली त्यामुळे  बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाला दारून पराभव पत्करावा लागला. त्या मुळे एका पत्रकाराने बजरंग सोनवणे याच्यावर संशय व्यक्त असे वृत्त प्रकाशित केले. हे वृत्त बजरंग सोनवणे यांच्या चांगलेच जिव्हारी लागलेलं दिसतंय आणि याचे कारण म्हणजे नुकतेच बीड येथे झालेल्या आ. संदीप क्षीरसागर यांच्या एका सत्काराच्या कार्यक्रमात खासदार बजरंग सोनवणे यांनी “बीड मधील पत्रकाराने खासदार बजरंग सोनवणे यांच्यावर निकाला नंतर संशय व्यक्त अस लिहलय. काय तुला आला, तुझ्या बायकोला आला, का तुझ्या पोराला आला” असं बेताल वक्तव्य केलं.
     हे वक्तव्य करताना बजरंग सोनवणे हे विसरले की, त्यांच्या विजयात जिल्ह्यातील पत्रकारांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सिहांचा वाटा आहे वास्तविक सोनवणे यांनी हे वृत्त खिलाडू वृत्तीने घेऊन आत्मचिंतन करायला हवं होत., किमान बीड जिल्ह्यात निर्माण झालेल्या राजकीय परस्थितीमुळे तरी हे वक्तव्य करताना हा विचार करायला हवा होता. स्व. विलासराव देशमुख, स्व. गोपीनाथ मुंडे, स्व. आर आर पाटील या व्यक्ती राजकारणात पुढे कशा गेल्या, त्यांचं खिलाडू वृत्तीचं राजकारण कस होत याचा अभ्यास त्यांनी करायला हवा.
    बजरंग सोनवणे यांनी केलेल्या या बेताल वक्तव्याचा आज जिल्हा भरातील पत्रकारा मधून जाहीर निषेध व्यक्त होत आसून या वक्तव्या बद्दल जाहीर माफी मागावी अशी मागणी पत्रकारा मधून होत आहे.

भाजप प्रवक्ते व जेष्ठ पत्रकार राम कुलकर्णी यांनी केला निषेध

     या संदर्भात भाजप प्रवक्ते व जेष्ठ पत्रकार राम कुलकर्णी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे ती अशी ज्या खासदारांना पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे का लोकसभेचा याच ज्ञान नाही त्या बजरंग बप्पा सोनवणे यांनी पत्रकार बांधवावर घेतलेलं तोंड सुख अयोग्य आणि निषेधार्थ आहे
विधानसभा निवडणुकित त्यांच्या नेत्रत्वा खाली पक्षाला अपयश आले .
माझा सवाल त्यांचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांना ? तुमची हिच संस्कृती आहे का ? आपल्या खासदारांच बोलण तुम्हाला मान्य का ?
सोनवणे यांनी पत्रकारांची जाहिर माफी मागावी अशी मागणी भाजप प्रवक्ते व पत्रकार राम कुलकर्णी यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!