ईव्हीएम वर नोंदल्या गेलेले मतदान मान्य नसल्याने बँलेट पेपर वर चाचणी मतदान घेण्याचा माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी ग्रामस्थांचा ऐतिहासिक निर्णय
ईव्हीएम वर नोंदल्या गेलेले मतदान मान्य नसल्याने बँलेट पेपर वर चाचणी मतदान घेण्याचा माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी ग्रामस्थांचा ऐतिहासिक निर्णय
सोलापूर:- (प्रतिनिधी)
20 नोव्हेंबर रोजी झालेल्या मतदानाच्या वेळी ईव्हीएम मशीन वर नोंदल्या गेलेले मतदान हे मान्य नसल्याने 3 डिसेंम्बर रोजी बँलेट पेपर वर चाचणी मतदान घेण्याचा माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी ग्रामस्थांनी ऐतिहासिक निर्णय घेतला असून ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्याची नियुक्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांनी तहसीलदार यांच्या कडे केली आहे.
नुकत्याच पार पडलेल्या विधान सभा निवडणुकी मध्ये महायुतीला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर राज्य भरात खळबळ उडाली असून या संदर्भात ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित केल्या जात आहे. अशाचं पद्धतीने संशयकल्लोळात सापडलेला मतदार संघ म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस.
या मतदार संघात भाजप महायुतीच्या बाजूने राम सातपुते तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाकडून उत्तम जानकर निवडणूक रिंगणात होते. निवडणुकीत उत्तम जानकर यांचा विजय झाला आणि राम सातपुते यांचा पराभव झाला तरीही मतदार संघातील अनेक गावांत ईव्हीएम मशीन विषयी शंका घेण्यात येऊ लागली.
या गावा पैकी एक गाव म्हणजे मरकडवाडी आणि याच गावातील ग्रामस्थांनी आता ईव्हीएमवर शंका घेतली असून गावात नोंदवल्या गेलेल्या
2300 मतदाना पैकी प्रत्यक्षात 1905 मतदान झालं या पैकी राम सातपुते यांना 1003 आणि उत्तम जानकर यांना 850 मतदान झाल्याचे निवडणूक निकालात दिसून आले. राम सातपुते यांना गावातून एवढं मतदान पडूच शकत नाही असा ग्रामस्थांनी दावा करून ईव्हीएम मशीन वर नोंदल्या गेलेले मतदान हे मान्य नसल्याने मारकडवाडी ग्रामस्थांनी सर्वानुमते ठराव घेऊन 3 डिसेंम्बर रोजी बँलेट पेपर वर चाचणी मतदान घेण्याचा ऐतिहासिक निर्णय घेऊन ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्याची नियुक्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांनी तहसीलदार यांच्या कडे केली आहे.
या साठी उत्तम जानकर गटाने स्व खर्चांने मतपत्रिका छापून घेतल्या असून
मतदात्यांनी 20 तारखेला ज्याला मतदान केलं त्याच उमेदवाराला
बँलेट पेपर मतदान करावे असे आवाहन करण्यात आले आहे. या निवडणूक प्रक्रिये साठी प्रशासनाने सहकार्य न केल्यास माध्यमाच्या सहकार्याने मतदान घेण्याचा निर्णयही ग्रामस्थांनी घेतला असून त्याच दिवशी मतमोजणी केली जाणार आहे व दोन्ही मध्ये काय तफावत येते हे पाहिलं जाणार आहे,
राज्यातील हा पहिला प्रयत्न असून गावातील ज्यांना कमी मते पडली तो उत्तम जानकर गट यात सक्रिय झाला असून भाजपच्या राम सातपुतेचा गट या निवडणूक प्रक्रिये मध्ये कितपत प्रतिसाद देतो यावर दूध का दूध पाणी का पाणी होणार आहे.
