राजकारण

नंदकिशोर मुंदडा उर्फ काकाजींची व्युव्हरचना, पंकजाताई मुंडे यांनी केलेली शिष्टाई यासह मुंदडा व आडसकर यांची दिलजमाई या मुळेच सौ नमिता अक्षय मुंदडा यांना गाठता आला विजयाचा टप्पा

नंदकिशोर मुंदडा उर्फ काकाजींची व्युव्हरचना, पंकजाताई मुंडे यांनी केलेली शिष्टाई यासह मुंदडा व आडसकर यांची दिलजमाई या मुळेच सौ नमिता अक्षय मुंदडा यांना गाठता आला विजयाचा टप्पा

5 वर्षातील अडीच हजार कोटींची विकास कामे, मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेचे वारे असताना अल्प मताने झालेला विजय आत्मचिंतन करायला लावणारा

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
     मागील 35 वर्षा पासून केज मतदार संघात सर्वांच्या सुखदुःखात जाऊन ग्राउंड लेव्हलला काम करणाऱ्या नंदकिशोर मुंदडा उर्फ काकाजी यांची व्युव्हरचना, आ पंकजाताई मुंडे यांनी केलेली शिष्टाई सोबत मुंदडा व आडसकर यांची दिलजमाई या मुळेच भाजप महा युतीच्या उमेदवार सौ नमिता अक्षय मुंदडा यांना विजयाचा टप्पा गाठता आला हे जरी खरं असलं तरी हा विजय आत्मचिंतन करायला लावणारा आहे हे सत्य नाकारून चालणार नाही.
    सन 1990 साली केज विधानसभा मतदार संघात अरुणोदय झाला तो स्व. विमलताई मुंदडा यांच्या राजकीय कारकिर्दीचा आणि त्यांच्या पाठीशी ताकत निर्माण झाली ती त्यांचे पती नंदकिशोर मुंदडा उर्फ काकाजी यांची.
त्या वेळ पासून आज तागायत केज विधानसभा मतदार संघात सर्वांच्या सुख दुःखात सहभागी होण्यासाठी दिवस रात्र धाव घेऊन काम करणारी व्यक्ती म्हणून काकाजी यांचं नाव समोर येते. आजही काकाजीच वय 70 च्या घरात असलं तरी ते दिवस रात्र ऊन वारा पाऊस असला तरी दिवस भरात कमीत कमी 400 किलोमीटर प्रवास करून कोणाचे लग्न असेल, कोणाचा सखरपुडा असेल, कोणाची वास्तू शांती असेल, कोणी मयत झालं असेल, कोणाच दवाखाण्याचं काम असेल अशा वेळी आपली उपस्थिती देऊन सर्वासाठी मदतीला धाव घेत असतात.
   ग्राउंड लेव्हलला काम असल्याने काकाजीला मतदार संघातील प्रत्येक गावची व त्या ठिकाणी स्थानिक नेतृत्व करणाऱ्या मंडळीची नस ना नस माहीत असल्याने स्व. विमलताई मुंदडा यांच्या हयाती मधील प्रत्येक निवडणुका आणि त्यांच्या पश्चात त्यांच्या सूनबाई सौ नमिता अक्षय मुंदडा यांच्या निवडणूकी मध्ये त्यांची रिंग मास्टर ची भूमिका राहिलेली आहे. याही निवडणुकीत सौ नमिता मुंदडा यांच्या विजया साठी काकाजीनी जी व्युव्हरचना आखली त्या व्युव्ह रचने मुळे सौ नमिता मुंदडा यांना विजयाचा टप्पा गाठता आला.
    मतदार संघातील जनता काकाजी यांच्या कार्यपद्धती वर समाधानी असताना विरोधक मात्र एकत्रित येऊन निवडणूक काळात घराणे शाही, मक्तेदारी, दडपशाही या सारखे आरोप
करून त्यांच्याच नावाला बदनाम करत भाजप महा युतीच्या उमेदवार सौ नमिता अक्षय मुंदडा यांच्या विषयी गरळ ओकण्याचे काम करत होते.
   सौ नमिता मुंदडा व अक्षय मुंदडा यांची कामाची पद्धत आणि काकाजी यांची व्युव्हरचना या मुळे भाजप पेक्षाही त्यांना वयक्तिक रित्या मानणारा वर्ग हा मोठ्या प्रमाणावर मतदार संघात असल्याने मतदारानी विरोधकांच्या भूल थापाला बळी न पडता नमिता मुंदडा यांना विजयी केले. भलेही हा विजय हा अल्प मताचा असला तरी तो शेवटी वीजयच असून तो आत्मचिंतन करायलाच लावणारा आहे व याचे कारण ही तसेच म्हणावे लागेल.
    एवढा मोठा जनसंपर्क असताना, सर्वांच्या सुख दुःखात सहभाग असताना, मागील 5 वर्षात मतदार संघात अडीच हजार कोटींची विकास कामे आणलेली असताना, राज्यभर मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेचे वारे असताना त्यांचा एवढ्या अल्प मताने विजय होतो आणि तो विजय खेचून आणण्यासाठी नंदकिशोर मुंदडा, अक्षय मुंदडा व त्यांच्या टीमला काय काय प्रयत्न करावे लागले, लक्ष्मी दर्शनाचा लाभ कोणा कोनाला व कशा पद्धतीने करावा लागला या बद्दल अधिक न लिहलेल बरं, सौ नमिता मुंदडा या भाजपच्या उमेदवार असल्याने केंद्रीय रस्ते विकास मंत्री ना नितीनजी गडकरी यांच्या भाषणा नंतर आर एस एस ची टीम कार्यरत झाली होती. भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी यांच्या पुढाकाराने आ पंकजाताई मुंडे यांनी नाराज झालेल्या संतोष हंगे, रमाकांत मुंडे, राणा डोईफोडे, विष्णू घुले, या सारख्या मंडळीची शिष्टाई करण्यात आल्याने ही मंडळी कार्यरत झाली. शेख रहीम यांच्या माध्यमातून भाजप कडे कधी न वळणारा मुस्लिम समाज मोठ्या प्रमानावर स्वतः कडे आकर्षित करण्यात त्यांना यश आलं.  नव्या फळी मधील लोकांना जोडणारी विलास सोनवणे, शेख रहीम, डॉ वसुदेव नेहरकर, भगवान केदार, महादेव मस्के, लिंबराज फरके, सुनील गलांडे, सारंग भाई पुजारी, संजय गंभीरे,
दिलीप सांगळे, श्रीमती शोभा लोमटे, प्रकाश बोरगावकर, हिंदुलाल काकडे, शंकर उबाळे, कमलाकर कोपले, सुरेश कराड, अनंत दादा लोमटे, सुनील घोळवे, शिवाजी पाटील, राहुल गदळे,  राम मेजर, नेताजी शिंदे, विजय केंद्रे, शिवाजी मामडगे, डॉ निशीकांत पाचेगावकर, कल्याण काळे, धनराज सोळंकी, संतोष लोमटे, सत्यप्रेम इंगळे, खदिर कुरेशी, नूर पटेल, गोपाल मस्के, अनंत अरसुडे, पंडित जोगदंड, शरद इंगळे, महादेव सोमवंशी,  बाळासाहेब सोनवणे, बळीराम चोपणे, अशोक गायकवाड, शिवाजी जाधव, बप्पा सोनवणे, पंडित सावंत, दत्ता धस, अनंत शिंदे, विनोद पोखरकर, मुन्ना शिंदे, अतुल इंगळे, अनिरुद्ध शिंदे, शिरीष मुखडे, सोहेल कुरेशी, अक्षय भूमकर, अभिमन्यू वैष्णव, श्रीपाद डांगे, मंदार काटे, संतोष शिनगारे या सारखी मंडळी मोठ्या प्रमाणावर परिश्रम घेताना दिसत होती,
    ऐवढे होऊन ही गणित जुळवण्या साठी त्यांनी मतदार संघातील खा. बजरंग सोनवणे व रमेश आडसकर यांच्यातील संघर्षाचा पुरेपूर फायदा उठवला आणि रमेश आडसकर यांना आपलंसं करण्यात यश मिळवल आणि मुंदडा आडसकर यांच्या मधील दिलजमाई मुळे सौ नमिता मुंदडा यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली हे वास्तव कोणीही नाकारू शकत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!