पृथ्वीराज साठे यांनी व्यक्त केले केज मतदार संघातील मतदारांचे ऋण व्यक्त
पृथ्वीराज साठे यांनी व्यक्त केले केज मतदार संघातील मतदारांचे ऋण

सर्व मतदारा पर्यंत पोचण्यास मी कमी पडलो, काही नेत्यांनी शब्द देऊन धोका दिला, ज्या ठिकाणहून मताधिक्य अपेक्षित होते तिथेही धोका झाला या बद्दल केली खंत व्यक्त
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
केज मतदार संघातील मतदारांनी माझ्या सारख्या सामान्य मानसावर जे अभूतपूर्व प्रेम केलं त्या बद्दल मी सर्वांचा ऋणी आहे, मतदार संघातील सर्व मतदारा पर्यंत पोचण्यास मी आणि माझी यंत्रणा कमी पडली. मतदार संघातील काही नेत्या कडून मला सहकार्याची असलेली अपेक्षाही फोल ठरली, ज्या ठिकाणहून मला मताधिक्य मिळेल त्या ठिकाणीही धोका बसला व मतदार संघात जनशक्ती विरुद्ध धनशक्तीचा विजय झाला माझा पराभव मला मान्य असून या पुढेही मतदार संघातील सामाजिक कार्याशी मी बांधील आहे अशी प्रतिक्रिया केज मतदार संघात निसटता पराभव पत्करलेले रा कॉ शरदचन्द्र पवार गटाचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांनी झुंजार न्यूज शी बोलताना व्यक्त केला.
झुंजार न्यूज शी बोलताना पृथ्वीराज साठे म्हणाले की, आमचे नेते मा शरदचंद्रजी पवार साहेब, पक्षाध्यक्ष मा जयंत पाटील साहेब, मा सुप्रियाताई सुळे यांनी केज मतदार संघांची उमेदवारी देत असताना माझ्यावर जो विश्वास टाकला या विश्वासास पात्र राहून मी निवडणुकीला सामोरे गेलो. बीड जिल्याचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे, डॉ नरेंद्र काळे, माजी आ संगीताताई ठोंबरे, राजकिशोर पापा मोदी, अंजली ताई घाडगे, हारूनभाई ईनामदार, सिताताई बनसोड, बबन भेय्या लोमटे, दिलीप काळे, अमर देशमुख, कॉ बब्रुवान पोटभरे, या प्रमुख नेत्यासह कार्यकर्त्यांनी माझ्या साठी जीवतोड मेहनत केली, अनेक आया बहिणीने, भावाने स्वतःच्या लेकरांचा तोंडचा घास काढून माझ्या प्रचारा साठी आर्थिक हातभार लावला त्यामुळेच 1 लाख 14 हजार 394 मतदार मायबाप जनतेने मतदान रुपी आशीर्वाद दिले. या सर्वांचे ऋण मी कधीही विसरू शकत नाही.
मला आलेल्या अपयशाची कारण मिमांसा शोधत असताना मला लक्षात आलं की निवडणूक काळात मतदार संघातील सर्व मतदारा पर्यंत पोचण्यास मी आणि माझी यंत्रणा कमी पडली. मतदार संघातील काही नेत्या कडून मला सहकार्याची अपेक्षा होती, त्यांनी मला सहकार्य करण्याचे अश्वासन ही दिले होते. मात्र मतदार संघातील श्रेय वादाच्या लढाई मध्ये त्यांनी मला सहकार्य केलं नाही व या श्रेय वादाच्या लढाई मध्ये आमच्या विरोधकांना सहकार्य करत असताना ते स्वतःची लढाईही हारून बसले, महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या काही बड्या नेत्यांनी ही ज्या पद्धतीने मतदान वाढी साठी सहकार्य करायला हवे होते ते केले नसल्याचे स्पष्ट पणे लोक बोलत आहेत, त्यांनीही विरोधकांना सहकार्य केले त्यामुळे या नेत्या कडुन माझी असलेली अपेक्षा फोल ठरली.
अंबाजोगाई, केज सह ज्या ठिकाणहून मला मताधिक्य मिळेल त्या ग्रीन बेल्ट मधेही मला धोका बसला, मतदार संघात जनशक्ती विरुद्ध धनशक्तीचा विजय झाला लक्ष्मी दर्शन देण्यासाठी मी कमी पडलो, तरीही मला 1 लाख 14 हजार 394 मायबाप जनतेने मला मतदान रुपी आशीर्वाद दिले. या सर्व घडामोडीत झालेला माझा निसटता पराभव मला मान्य असून या पुढेही मतदार संघातील सामाजिक कार्याशी मी बांधील आहे अशी प्रतिक्रिया यावेळी पृथ्वीराज साठे यांनी झुंजार न्यूज शी बोलताना व्यक्त केली.
