“पंकुताई” असा नामोल्लेख करत आमदार सुरेश धस यांचे आ पंकजाताई मुंडे यांच्यावर गंभीर आरोप, जिल्ह्यात खळबळ
“पंकुताई” असा नामोल्लेख करत आमदार सुरेश धस यांचे आ पंकजाताई मुंडे यांच्यावर गंभीर आरोप, जिल्ह्यात खळबळ
आष्टी — (प्रतिनिधी)
“पंकुताई” असा नामोल्लेख करत आज आष्टीचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांनी निवडणुकीत तुम्ही माझ्यासोबत राहणे गरजेचे होते पण तुम्ही मला एकटे पाडत विरोधकांचा छुपा प्रचार केला असा खळबळ जनक आरोप विजयी सभेत आ पंकजाताई मुंडेंवर केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
आष्टी मतदारसंघात भाजपाचे सुरेश धस यांनी विक्रमी मतांनी विजय मिळवल्यानंतर आयोजित जाहीर सभेत पंकजा मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले. आ.धस म्हणाले, पंकजा मुंडे यांनी या निवडणूकीत तुम्ही माझ्या सोबत राहणे आवश्यक होते मात्र तुम्ही मला एकटे पाडले. तुमच्या दुटप्पी भूमिकेमुळे मतदार राजामध्ये संभ्रम निर्माण झाला. शेवटी मतदार राजा हा हुशार आणि चतुर आहे. त्यांनी मलाच हेरल. मी आयुष्यात कधीच जातीपातीचे राजकारण केले नाही. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांचा मी चेला आहे. त्यामुळे आयुष्यात कधीच मला राजकारण करण्यासाठी जात पात शिवणार नाही.
मी लोकसभेच्या वेळेस एकतर्फी माझ्या मराठा समाजाचा तुमचा प्रचार करून अंगावर रोष घेतला मात्र तुम्ही या विधानसभा निवडणुकीत छुपा डाव खेळलात हे चांगलं केलं नाही. त्यामुळे तुम्ही हलक्या कानाने राजकारण करता असं मला वाटलं. असा थेट आरोप सुरेश धस यांनी पंकजा मुंडे यांच्यावर आष्टी येथील जाहीर विजयी सभेत केला. पंकजा मुंडे यांनी असं करायला नको होतं, असं देखील सुरेश धस यांनी म्हटले आहे.