राजकारण

*परळी- धनंजय मुंडे, केज- सौ नमिता मुंदडा, आष्टी – सुरेश धस, गेवराई- विजय सिंह पंडित, बीड मधून संदीप क्षीरसागर, माजलगाव मधून प्रकाश दादा सोळंके विजयी*

परळी- धनंजय मुंडे, केज- सौ नमिता मुंदडा, आष्टी – सुरेश धस, गेवराई- विजय सिंह पंडित, बीड मधून संदीप क्षीरसागर विजयी, माजलगाव मधून प्रकाश दादा विजयी
अंबाजोगाई :-(प्रतिनिधी)
    परळी विधानसभा मतदार संघात धनंजय मुंडे, आष्टी मतदार संघात सुरेश धस तर गेवराई मतदार संघात विजय सिंह पंडित हे प्रचंड मताधिक्याने तर
केज मतदार संघात सौ नमिता मुंदडा विजयी तर
माजलगाव मधून प्रकाश दादा सोळंके हे महायुतीचे उमेदवार बीड मधून महाविकास आघाडीचे संदीप क्षीरसागर अटीतटीच्या लढती मध्ये विजयी झाले.
     महाराष्ट्रा मधील 288 विधानसभा मतदार संघासह बीड जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदार संघांची मतमोजणी आज कुठलाही अनुचित प्रकार न होता अतिशय शांततेत पार पडली. या परळी विधानसभा मतदार संघामध्ये महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे धनंजय मुंडे हे महाविकास आघाडीचे राजेसाहेब देशमुख यांच्या पेक्षा 1 लाख 40 हजार विक्रमी मते घेऊन विजयी झाले.
    आष्टी मतदार संघात भाजप महायुतीचे सुरेश धस हे अपक्ष उमेदवार भीमराव धोंडे यांच्या पेक्षा 77700
मते अधिक घेऊन विजयी झाले
    गेवराई मतदार संघात महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विजय सिंह पंडित हे महाविकास आघाडी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे
बदामराव पंडित यांच्या पेक्षा 42000
अधिक मते घेऊन विजयी झाले.
   अत्यन्त अतितटीच्या झालेल्या केज विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत विद्यमान भाजप महायुतीच्या आमदार सौ नमिता अक्षय मुंदडा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांच्या पेक्षा 2700 अधिक मते घेऊन विजय मिळवला.
     बीड विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडी शरदचंद्रजी पवार गटाचे संदीप क्षीरसागर हे महायुती अजित पवार गटाचे योगेश क्षीरसागर यांच्या पेक्षा 7300 अधिक मते घेऊन विजयी झाले. तर माजलगाव मतदार संघात महायुती अजित पवार गटाचे प्रकाश दादा सोळंके हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे मोहनराव जगताप यांच्या पेक्षा 5871 अधिक मते घेऊन विजयी झाले  आसून बीड जिल्ह्यात महायुतीला 5 जागेवर तर महाविकास आघाडीला 1 जागेवर विजय मिळवता आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!