Tuesday, May 20, 2025
Latest:
परळी वैजनाथ

परळीचे नामांकित व्यापारी अमोल विकास डुबे खंडणी साठी केलेल्या अपहरण प्रकरणी 5 जण ताब्यात, धागेदोरे अंबाजोगाई मध्ये गुंतले, 17 लाख रुपयांचा ऐवज जप्त

परळीचे नामांकित व्यापारी अमोल विकास डुबे खंडणी साठी केलेल्या अपहरण प्रकरणी 5 जण ताब्यात, धागेदोरे अंबाजोगाई मध्ये गुंतले, 17 लाख रुपयांचा ऐवज जप्त

परळी:- (प्रतिनिधी)
     अमोल डुबे अपहरण व खंडणी प्रकरणाचे धागेदोरे अंबाजोगाई मध्ये गुंतल्याचे समोर आले असून  या प्रकरणी परळी पोलिसांनी येथील 4 आरोपीसह 5 आरोपीच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्या कडून 17 लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
    केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आल्याचा घटनेला 12 तास ही लोटत नाहीत तोच
परळीचे येथील वैद्यनाथ बँकेचे माजी चेअरमन व स्व. गोपीनाथ राव मुंडे यांचे निष्ठावंत जेष्ठ कार्यकर्ते पेट्रोल पंपाचे मालक विकास डुबे यांचे चिरंजीव व परळीच्या औद्योगिक वसाहती मध्ये बॅटरीचा व्यवसाय करणारे नामांकित व्यापारी अमोल विकास डुबे हे काल रात्री आपला व्यवसाय बंद करून घरा कडे निघालेले असता या परिसरात स्विफ्ट कार मध्ये दबा धरून बसलेल्या काही आरोपीने अमोल डूबे यास गाठून मारहाण केली आणि स्विफ्ट कार मध्ये घालून अंबाजोगाईच्या दिशेने घाटात नेऊन त्याला बंदुकीचा धाक दाखवून जिवे मारण्याच्या धमक्या देवून त्यांना कारमध्ये अपहरण करून कन्हेरवाडी घाटामध्ये घेवून जाणून त्यांच्याकडून खंडणी म्हणून त्यांच्याकडे असलेली नगदी 3,88,300 व 10 तोळे सोन्याचे बिस्कीट किंमत अंदाजे 4,00,000 असा एकूण 8,28,300/- रुपयाचा माल घेवून गेले.
   अमोल डुबे यांचे परळी शहरातून खंडणी साठी अपहरण झाल्याने खळबळ उडाली. विधान सभा निवडणूक काळातील काही घटना आणि नंतर च्या काही घटना पाहता खरंच बीड चा बिहार झालाय या चर्चेला पुष्टी मिळते आहे.
    या प्रकरणी परळी शहर पोलिसात गुन्हा दाखल झाल्या नंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवल्या या गुन्ह्याचे धागेदोरे परळी मार्गे अंबाजोगाई मध्ये गुंतल्याचे पोलीस यंत्रणेच्या निदर्शनास आले.
    या प्रकरणी गुन्हयातील आरोपी नामे चैतन्य पंढरी उमाप यय 34 वर्षा. पळसखेडा ता केज जि बीड) सागर ऊर्फ बबलू शंभू सूर्यवंशी वय 22 वर्ष रा. आंबेडकर चौक आनंदनगर लातुर ह. परळीवेस अंबाजोगाई, शंकर भगवान जोगदंड वय 22 वर्ष रा.साठे नगर परळी वेस ता अंबाजोगाई  संचिन श्रीराम जोगदंड वय 25 वर्ष रा साठे नगर परळीवेस ता. अंबाजोगाई 5) जय उर्फ सोनू संजय कसबे वय 26 वर्ष रा. सिध्दार्थ नगर परळी वैजनाथ यांना ताब्यात घेतले असून आरोपी कडून खंडणी पोटी घेवुन गेलेले 10 तोळे सोन्याचे बिस्कीट 8,00,000/- रुपयाचे व नगदी 1,12,000/- रक्कम जप्त करण्यात आली आहे. गुन्हयात फिर्यादीचे अपहरण करण्यासाठी वापरण्यात आलेल्या कार स्वीफ्ट डिझायर किमत 2,00,000/- रुपये व टाटा पंच किमत 6,00,000/- असा एकुण 17,12,000/- रुपयाचा माल जप्त करण्यात आला. आरोपी नामे सचीन श्रीराम जोगदंड याचे ताब्यातून गुन्हयात वापरण्यात आलेला गावठी कट्टा य एक जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहे. गुण्याह्याचा मास्टर माईड जय संजय कसबे याची गोपनीय माहिती मिळवून तपास पथकाने त्यास पुणे येथे अटक केलेले आहे.
   ही कामगिरी पोलीस अधिक्षक बीड, श्री. अविनाश बारगळ साहेब, मा. अपर पोलीस अधिक्षक अंबाजोगाई श्रीमती चेतना तीडके मैडम व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी गेवराई अती पदभार अंबाजोगाई श्री. राजगुरु साहेब यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक श्री.रघुनाथ नाचण, पोलीस निरीक्षक श्री. धनंजय ढोणे साहेब, सहा पोलीस निरीक्षक श्री.योगेश शिंदे सहा. पोलीस निरीक्षक श्री.नितीन गड्डुवार, पोह/1253 नरहरी नगरगोजे, पोह/ 1224 बालाजी दराडे  पोह: 562 भास्कर केंद्रे, पोह/ 1145 गोविंद येलमटे, पोह/ 1753 अंकुश मेंडके, योमा/1918 गोविंद भताने  पोअं/1313 पंडीत पांचाळ, IT सेल बीड चे 12 पीअं/2068 विक्की सुरवसे यांनी पार पाडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!