संतोष देशमुखच्या हल्ले खोरांना कडक शासन झाले पाहिजे या साठी मी स्वतः मुख्यमंत्री मा ना देवेंद्र फडणवीस आणि बीडच्या एस पी ला बोलले -आ पंकजाताई मुंडे
*उद्या अंबाजोगाई बंदचे आवाहन*
परळी (प्रतिनिधी)
संतोष देशमुख हा माझा लहान भाऊ असून त्याच्या हत्येच जेवढं दुःख त्याच्या परिवाराला आहे तेवढेच दुःख मलाही असून हल्ले खोरांना कडक शासन झाले पाहिजे या साठी मी स्वतः मुख्यमंत्री मा ना देवेंद्र फडणवीस आणि बीडच्या एस पी ला बोलले आहे अशी प्रतिक्रिया आ पंकजाताई मुंडे यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केली.
या वेळी बोलताना त्या म्हणाल्या की, जसा नेता तसा कार्यकर्ता तयार होतो. आम्ही आमच्या कार्यकर्त्यावर चांगले संस्कार करण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्या कार्यकर्त्या कडून कोणाला नख ही लागले नाही पाहिजे ही माझी अपेक्षा आहे. स्व. मुंडे साहेब गृहमंत्री होते त्यावेळी अनेक गुन्हेगाराला त्यांनी यमसदनी पाठवलं आहे. मुंबई ला अंडरवर्ल्ड मुक्त करण्याचे काम त्यांनीं केले.
मी मंत्री असताना माझा पाहुणा, त्याचा पाहुणा, आपला तुपला असं कधी पाहिलं नाही, मी पाहिली ती माणुसकी, लोकसभा निवडणुकी नंतर मी कार्यकर्त्याला आवाहन केलं होतं मन मोठं करा निवडणूका येतील आणि जातील. कोणी विरोधात काम केलं म्हणून काय त्याच्या जीवावर उठायचं असत का?
संतोष देशमुख हा माझा लहान भाऊ होता, त्याने माझ्या सोबत काम केलेले आहे. त्याची हत्या झाली त्याचा मी संताप व्यक्त करते. पंकजाताई तुमच्या दुःखात मी सहभागी आहे. आज तो आपल्यातून गेला आहे, एखाद्या आईच्या पोटच लेकरू जात त्या आई च्या यातना एक स्त्रीच समजू शकते, त्या आईच्या आणि कुटुंबाच्या दुःखात मी सहभागी आहे. लेकराचा जीव गेला याच मनापासून दुःख व्यक्त करते. एखाद्याने कॉलर धरली तुम्ही त्याची कॉलर धरा, एखादयाने एक मारली तुम्ही दोन मारा. एखाद्याचा जीव घ्यायला तुम्ही काय ईश्वर आहेत काय? राक्षस आहेत का? हे चालणार नाही. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलले, बीड च्या एस पी ला बोलले. दोषी असेल त्याला कडक शिक्षा ही झालीच पाहिजे. अशी परिस्थिती परत बीड जिल्ह्यावर येऊ नये, ही परमेश्वर व प्रभू वैद्यनाथ चरणी अशी प्रार्थना करते.
अक्षय मुंदडा यांना मी संतोषच्या घरी पाठवून पंकजाताई तुमच्या दुःखात सहभागी आहे या सहवेदना मी त्यांच्या कुटुंबिया पर्यंत पोचवणार आहे.
*उद्या अंबाजोगाई बंदचे आवाहन*
संतोष देशमुख हत्याच्या निषेधार्थ उद्या शुक्रवार रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने अंबाजोगाई बंदचा इशारा देण्यात आला असून शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार बंद ठेऊन आपल्या संतप्त भावना व्यक्त कराव्यात असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले असून अत्यावश्यक सेवेला यातून वगळण्यात आले आहे.
Post Views: 292