Tuesday, September 9, 2025
परळी वैजनाथ

*घर घर मै है डी एम, मन मन में है डी एम* *आपला माणूस, कामाचा माणूस मुळे धनंजय मुंडे यांचे घड्याळ आघाडीवर*

 

**परळी वैजनाथ (प्रतिनिधी)

परळी विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार व विद्यमान आमदार धनंजय भाऊ मुंडे हे प्रचारात आघाडीवर असून विरोधकांनी जंग जंग पछाडले तरी त्यांचा विजय हा काळ्या दगडावरील पांढरी रेघ असून त्यांच्या विजयाचा अश्वमेध कोणीही रोखू शकत नाही.
परळी शहरातील घराघरात प्रत्येकाच्या मनामनामध्ये धनंजय मुंडे हे आपल्या कामातून व आपुलकीच्या संबंधामुळे अतिशय परिचित असणारे उमेदवार आहेत. उमेदवार आहेत. . त्यामुळे परळी विधानसभेतील प्रत्येक गावांमधून व शहरातून केवळ धनंजय मुंडे यांचे घड्याळ हे चिन्ह मतदार स्वीकारणार असून येत्या 20 तारखेला घड्याळाच्या चिन्हासमोरील बटन ते दाबणार आहेत. परळी विधानसभा मतदारसंघांमध्ये धनंजय मुंडे यांनी मोठ्या प्रमाणावर महायुती सरकारच्या माध्यमातून करोडो रुपयाचा विकास निधी आणून परळी शहराचा चेहरा मोहरा बदलला आहे. प्रामाणिक व तळमळीने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा संच व अतिशय चांगले संघटन कौशल्य त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांचा विजय कोणी रोखू शकत नाही.घर घर मै है डी एम, मन मन में है डी एम हे वाक्य प्रत्येक परळीकर व ग्रामीण भागातील यांना मानणारे सच्चे कार्यकर्ते यांच्या हृदयातील वाक्य आहे. जो उमेदवार मतदारांच्या हृदयामध्ये आपले स्थान आपल्या तळमळीच्या कामातून निर्माण करतो त्याचा पराभव होऊ शकत नाही. प्रत्येक मतदाराला नावानिशी ओळखणारे हे नेतृत्व असून प्रत्येकाच्या अडचणीमध्ये, सुखदुःखामध्ये सहभागी होणारे धनंजय मुंडे व सौ राजश्रीताई मुंडे, आमदार पंकजाताई मुंडे यांना मानणारा परळी शहरात व ग्रामीण भागात मोठा मतदार आहे. जात-पात न मानणारे अनेक मतदार मुंडे घराण्यावर अनेक वर्षापासून प्रेम करतात. पंचम ज्योतिर्लिंग वैद्यनाथ मंदिराचा परिसर व शहरातील रस्ते तीर्थक्षेत्र विकास योजनेच्या माध्यमातून त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने बनविल्यामुळे परळी शहर हे बीड जिल्ह्यातील सगळ्यात प्रगत शहर म्हणून ओळखले जाते. परळी शहरातील व्यापार व उद्योगधंदे व्यवस्थित चालत असल्यामुळे परळीकरांचा धनंजय मुंडे यांच्यावरील राजकीय विश्वास वाढलेला आहे. धनंजय मुंडे यांचे नेतृत्व म्हणजे परळी शहराच्या पुढील 25 वर्षाचा विकासाचा प्लॅन आहे. विकासाची गॅरंटी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!