ऍड शंकर चव्हाण यांनी घेतली शरदचंद्रजी पवार साहेबांची भेट, परळी मधून निवडणूक लढण्यास ईच्छुक
परळी : (परळी)
परळी मतदार संघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले ऍड शंकर चव्हाण यांनी मुबंई येथे जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरदचंद्रजी पवार साहेबांची भेट घेतली असून त्यांनी आपल्या कामाचा लेखा जोखा असणारी फाईल त्यांच्या कडे सुपूर्त केली आहे,.
परळी मतदार संघा मधून निवडणूक लढण्यास ईच्छुक असलेले नांदगाव येथील रहिवासी व सद्या पुणे येथे वकिली व्यवसाय करणारे ऍड शंकर चव्हाण यांनी मागील काही वर्षात सामाजिक बांधिलकी म्हणून शेतकऱ्याच्या प्रश्नांसह अन्य विविध प्रश्नावर आवाज उठवला असुन निवडणूक डोळ्या समोर ठेऊन त्यांनी राज्याचे कृषी मंत्री मा ना धनंजय मुंडे यांना शह देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाची तुतारी हातात घेण्याचा निर्णय घेऊन आज मुबंई येथे जाऊन शरदचंद्र पवार साहेबांची भेट घेतली. या भेटी मध्ये त्यांनी आपल्या कामाचा लेखा जोखा असलेली फाईल पण सादर केली आहे.
