*परभणी येथील दंगल प्रकरणी अटक आरोपी पैकी सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा आज न्यायालयीन कोठडीत मृत्यू, शहाजी उमाप घटनास्थळी दाखल*
परभणी येथील दंगल प्रकरणी अटक आरोपी पैकी सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा आज न्यायालयीन कोठडीत मृत्यू शहाजी उमाप घटनास्थळी दाखल

परभणी(प्रतिनिधी)
परभणी येथील दंगल प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपी पैकी सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा आज न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने परभणी मध्ये पुन्हा वातावरण तणावपूर्ण झाले असून नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप हे परभणी मध्ये दाखल झाले असून परिस्थितीवर नियंत्रण ठेऊन आहेत.
परभणी शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या परिसरात असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची एका समाज कंटकांने दोन दिवसा पूर्वी विटंबना केल्या नंतर या घटनेची माहिती मिळताच आंबेडकरी अनुयायी संतप्त झाले या घटनेच्या निषेधार्थ परभणी येथे पर्वा दिवशीच रास्ता रोको, रेल रोको व किरकोळ दगडफेकीचे प्रकार घडले होते. काल पुन्हा परभणी बंदची हाक देण्यात आली होती. शहरात कडकडीत बंद पाळण्यात येत होता. या पार्श्वभूमीवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता. या प्रकरणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी निघालेल्या डॉ आंबेडकर अनुयायी महिला व पुरुष यांनी रस्त्या मधेच दुकानावर दगडफेक, वाहनावर दगडफेक व जाळपोळ सुरू केली. रस्त्यावर टायर जाळण्यात आले. या वेळी पोलिसांनी जमावास समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र जमाव एवढा संतप्त होता की, जमावाने पोलिसांवर ही दगडफेक सुरू केली, पोलीस व्हॅनवर दगडफेक करण्यात आली.
जमाव एवढ्यावर ही थांबला नाही त्याने थेट जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून आतील फर्निचरची मोडतोड केली. जिल्हाधिकारी महोदयांच्या टेबल वरील फाईल आणि महत्वाची कागदपत्रे फेकून दिले.
या प्रकरणी परभणी पोलिसांनी बळाचा वापर करून दंगल आटोक्यात आणली आणि 50 जनाला अटक करून गुन्हे दाखल केले.
अटक करण्यात आलेल्या आरोपी पैकी सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा आज न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने परभणी मध्ये पुन्हा वातावरण तणावपूर्ण झाले असून पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.
शहाजी उमाप परभणी मध्ये दाखल
प्राप्त माहिती नुसार मयत सोमनाथ सुर्यवंशी याचा मृत्यू न्यायालयीन कोठडीत झाला असून त्याचा मृत्यू नेमका कशा मुळे झाला हे शवविच्छेदन झाल्यावर समजणार आहे. सोमनाथ हा दलित समाजाचा नसून अन्य समाजाचा असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. दरम्यान या मृत्यूचे वृत्त समजताच नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप हे परभणी मध्ये दाखल झाले असून परिस्थितीवर नियंत्रण ठेऊन आहेत.
