संतोष देशमुख हत्या प्रकरणी एस आय टी चौकशी सह न्यायालयीन चौकशी करण्यात येईल- मुख्यमंत्री मा ना देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा
संतोष देशमुख हत्या प्रकरणी एस आय टी चौकशी सह न्यायालयीन चौकशी करण्यात येईल- मुख्यमंत्री मा ना देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा
बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या अराजकते विषयी व्यक्त केली चिंता, गुन्हेगाराची पाने मुळे खोदून काढण्याची दिली ग्वाही
नागपूर:- (प्रतिनिधी )
संपूर्ण राज्याला हादरवून टाकणाऱ्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री मा ना देवेंद्र फडणवीस यांनी कठोर पावले उचलत एस आय टी चौकशी सह न्यायालयीन चौकशी करण्यात येईल अशी विधानसभेत घोषणा केली असून बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या अराजकते चिंता व्यक्त करून गुन्हेगाराची पाने मुळे खोदून काढू अशी ग्वाही दिली आहे.
संतोष देशमुख हत्ये नंतर आ. जितेंद्र आव्हाड, आ सुरेश धस, आ संदीप क्षीरसागर, आ नमिता मुंदडा, आ विजयसिंह पंडित यांच्या विधान सभेतील सभागृहा मधील भावनिक आणि अंगावर शहारे आणणाऱ्या भाषणा मुळे सर्वच सदस्यांचे व ही भाषणे पाहून सर्वच दर्शकांचे डोळे पानावत होते. आरोपीस याच पध्दतीने शासन व्हावे अशी सर्वांची ईच्छा आहे. संतोष देशमुख यांच्या हत्ये नंतर शवविच्छेदन अहवाल समोर आला आसून यामध्ये देशमुख यांचा मृत्यू अतिरक्तस्रावाने झाल्याचे म्हटले आहे. संतोष देशमुख यांचे 9 डिसेंबरला अपहरण करुन त्यांची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणात विष्णू चाटे याच्यासह चौघांना पोलिसांनी आतापर्यंत अटक केली आहे. अद्याप तीन आरोपी फरार आहेत. विष्णू चाटे हा राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्या जवळचा माणूस असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे संतोष देशमुख यांच्या हत्येच्या गुन्ह्यात वाल्मिक कराड यांचा सहभाग असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. भाजपचे आमदार सुरेश धस आणि जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा अंगावर काटा आणणारा तपशील विधानसभेत मांडला होता.
आज विधान सभेत मुख्यमंत्री मा ना देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची बाजू मांडत असताना बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीवर चिंता व्यक्त केली. या ठिकाणी आराजकतेचे राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यास काही अंशी पोलीस प्रशासन ही दोषी आहे. येथील संघटित गुन्हेगारावर मोक्का अंतर्गत कार्यवाही केली जाईल अशी घोषणा केली. संतोष देशमुख हत्या होण्या पूर्वी खंडणीच्या विषया हुन जो राडा झाला यात वाल्मिक कराड यांचा रोल असल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले. मात्र संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तपासात जेजे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कार्यवाही होईल त्या साठी एस आय टी सोबत न्यायालयीन चौकशी केली जाईल अशी घोषणा ही या वेळी त्यांनी केली.
या वेळी त्यांनी देशमुख कुटुंबियाना 10 रु शासनाची मदत ही जाहिर करून घटने दिवशी केज चे पो नी महाजन यांनी आरोपी च्या शोधा साठी प्रयत्न केल्याचे सांगून जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या बदलीचे संकेत दिले.
