बर्दापूर ते लोखंडी सावरगाव रस्ता चौपदरी करण्यासाठी आवश्यक कामे प्राधान्याने करण्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे आदेश
बर्दापूर ते लोखंडी सावरगाव रस्ता चौपदरी करण्यासाठी आवश्यक कामे प्राधान्याने करण्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे आदेश
मुंबई (प्रतिनिधी)
माननीय ना. नितीनजी गडकरी यांनी सन 2024-25 च्या वार्षिक योजनेत बर्दापूर ते लोखंडी सावरगाव पर्यंतचा रस्ता चौपदरी करण्यासाठी विचारात घेण्याचे निर्देश देऊन आवश्यक कामे प्राधान्याने करण्याचे आदेश रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री यांच्या कार्यालयाचे तांत्रिक सल्लागार बी.डी. थेंग यांनी काढले आहेत.
या संदर्भात प्रादेशिक अधिकारी, रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, नवी मुंबई व मुख्य अभियंता (NH), सार्वजनिक बांधकाम विभाग, कोकण भवन मुंबई यांना 25 नोव्हेम्बर 2024 रोजी देण्यात आलेल्या पत्रात तांत्रिक सल्लागार बी.डी. थेंग यांनी म्हंटले यांनी म्हंटले आहे की, NH-548B लातूरपासून सुरू होते आणि NH-548D वर लोखंडी सावरगाव येथे संपते आणि एकूण लांबी सुमारे 47 किमी आहे, त्यापैकी लातूर ते बर्दापूर हा भाग 4 लेनिंग कॉन्फिगरेशनसह आहे आणि पुढे बर्दापूर ते लोखंडी सावरगाव (लांबी 19 किमी) 2 लेन आहे. पक्का खांदा. त्यामुळे बर्दापूर येथे 4 लेन आणि 2 लेन रोडच्या जंक्शनवर अपघात प्रवण ठिकाण आहे.
माननीय मंत्री महोदयांच्या लातूर दौऱ्यात लोकप्रतिनिधींनी बर्दापूर ते लोखंडी सावरगाव हा रस्ता चौपदरी करण्याची मागणी केली. तसेच, स्ट्रेचमधील वाहतूक 10000 PCU पेक्षा जास्त आहे जी 4 लेनिंगसाठी पात्र ठरते या बाबी लक्षात घेऊन सन 2024-25 च्या वार्षिक योजनेत बर्दापूर ते लोखंडी सावरगाव पर्यंतचा रस्ता चौपदरी करण्यासाठी विचारात घेऊन
आवश्यक कामे प्राधान्याने करावेत.
*झुंजार नेताचा सातत्याने आवाज*
लातूर ते लोखंडी सावरगाव या राष्ट्रीय महामार्गा वरील लातूर जिल्हा सरहद्दी पर्यंत रस्ता चार पदरी आणि पुढे बीड जिल्हा सरहद्दी मध्ये रस्ता दुपदरी
झाल्या पासून दैनिक झुंजार नेताने बीड जिल्हा सरहद्दी मध्ये हा रस्ता चौपदरी करावा या साठी सातत्याने लिखाणातून आवाज उठवला आहे आज पर्यंत हा रस्ता चारपदरी न झाल्याने या दुपदरी रस्त्यावर असंख्य अपघात होऊन शेकडो लोकांचे बळी गेले आसून मागील आठवड्या मधेच या रोडवरील टोलनाक्या जवळील अपघातात 5 जणांचा मृत्यु झाला आहे.
देर आये दुरुस्त आये केंद्रीय रस्तेव वाहतूक मंत्रालयाने या दुपदरी रस्त्याची गंभीर दखल घेऊन चारपदरीची प्रक्रिया सुरू केल्याने लवकरात लवकर हा रस्ता चार पदरी होऊन भविष्यातील अपघात टळतील अशी अपेक्षा करू या.
