Skip to content
शिंदे गटाचे आमदार आमश्या पाडवी यांनी घेतलेली शपथ ही चर्चेचा विषय सर्वत्र पाडवी यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून ट्रोल 
मुंबई (प्रतिनिधी)
अक्कलकुवा विधानसभा मतदार संघातून शिवसेना शिंदे गटा कडून विजयी झालेले आमदार आमश्या पाडवी यांनी घेतलेली शपथ ही चर्चेचा विषय ठरली असून सर्वत्र पाडवी यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून ट्रोल केल्याचे दिसून येत आहे.
राज्यात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि एकनाथ शिंदे व अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर ७ तारखेपासून राज्यात विशेष अधिवेशन बोलावून इतर आमदारांचा शपथविधी कार्यक्रम सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपासून जवळपास २०० हून अधिक आमदारांनी शपथ घेतली आहे. परंतु कालचा दिवस आमश्या पाडवी यांनी घेतलेल्या शपथविधीमुळे चर्चेत राहिला. त्यांना शपथविधीतील एकही शब्द नीट वाचता आला नाही. एवढेच नव्हे तर त्यांनी शपथ घेताना “मी आमशा पाडवी विधानसभा सदस्य म्हणून निवडून आलो नाही” त्यांचं हे वाक्य चांगलेच चर्चेत आले. त्यामुळे त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे.
अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून आमश्या पाडवी यांनी हिना गावित यांना पराभूत केलं. हिना गावित यांच्या उमेदवारीमुळे हा मतदारसंघ निवडणुकीच्या काळात चर्चेत होता. कधी भावनिक भाषणांनी तर कधी जहाल भाषणांनी हा मतदारसंघ निवडणुकीच्या केंद्रस्थानी राहिला. अटीतटीच्या ठरलेल्या या निवडणुकीत आमश्या पाडवी यांचा विजय झाला. आमश्या पाडवी यांनी विधानसभेत आमदारकीची शपथ घेतली. परंतु, त्यांची ही शपथ काल पासून चर्चेचा विषय ठरला आसुन सर्वत्र पाडवी यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून ट्रोल केल्याचे दिसून येत आहे.
Post Views: 320
error: Content is protected !!